केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत (What Is The So...

केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत (What Is The Solution, If Hair Turns Grey At A Young Age)

Grey hair solution

माझी मुलगी 17 वर्षांची आहे, तिची त्वचा तेलकट आहे. त्यामुळे तिचा चेहरा नेहमी मुरुमं, पुटकुळ्यांनी भरलेला असतो. कृपया, तिचा आहार कसा असावा आणि तिच्या तेलकट त्वचेसाठी दररोज कोणती काळजी घेऊ, यासाठी मला मार्गदर्शन करावे.
पार्वती, पुणे

तारुण्यात पदार्पण करत असताना हार्मोन्स असमतोल निर्माण होतो. त्यामुळे ही समस्या जाणवू शकते किंवा अनुवंशिकता पण अशा केसेसमध्ये असू शकते. त्यासाठी आपला आहार सकस असावा. नैसर्गिकरित्या निर्माण केलेल्या पालेभाज्या, फळे, कडधान्यं, अंडी यांचा आपल्या आहारात समावेश असावा. तसेच मार्केटमध्ये उपलब्ध असलेले सीतापील्स या कंपनीच्या ऑइल फ्री फेसवॉशचा मुरुमं व डाग असलेल्या तेलकट त्वचेवर चांगला परिणाम दिसून येतो. तसेच रात्री झोपतेवेळी क्लििंंझग व त्यानंतर गुलाबजलने टोनिंग करून एखादी ऑइल फ्री मॉइश्चरायजर क्रीम चेहर्‍यावर लावली तर तिच्या चेहर्‍यामध्ये फरक पडलेला जाणवेल.

मी 32 वर्षाची आहे. माझे केस कोरडे व राठ आहेत आणि आता हिवाळ्याच्या दिवसात अजून निस्तेज दिसतात. मला या कोरड्या केसांची निगा कशी राखावी याबद्दल मार्गदर्शन करावे.
नीता, लोअर परेल, मुंबई

केसांना व शरीरालासुद्धा मॉइश्चरायजरची गरज असते. त्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थांचा पण समावेश करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ – काळे तीळ, मनुके, बेदाणा, बदाम, अक्रोड, शेंगदाणे. त्याचप्रमाणे प्रथिनेयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. तसेच कोरड्या केसांना ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल, खोबरेल तेल, एरंडेल तेल, राईचे तेल याप्रकारच्या कोमट तेलाने मसाज करावा व नंतर टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो टॉवेल निथळून केसांना बांधावा. ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा करावी. नंतर केस धुवून टाकावे. आणि आंघोळीनंतर कोरड्या केसांना थोडेसे खोबरेल तेल लावून मॉइश्चरायजर करावे. असे आठवड्यातून एक वेळ जरी केले तर केस मऊ होण्यास मदत होते.

मी 22 वर्षांची तरुणी आहे. माझे केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत. त्याबद्दल तुम्ही मला मार्गदर्शन करावे.
अमृता, सातारा

पोषकतत्व कमी, चुकीच्या आहारपद्धती, स्ट्रेस, हार्मोन्स बदल यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात. आवळा हा कोणत्याही केसांवर नैसर्गिक उपाय ठरतो. रोज एक आवळा सेवनाने केस पांढरे होणे बंद होते. व केसांच्या सर्व समस्या दूर होतात. आठवड्यातून दोनदा पांढर्‍या केसांना जास्वंद, कडिपत्ता व आवळा, खोबरेल तेलात मिक्स करून चांगले उकळावे. हे मिश्रण केसांना लावावे. केस काळेभोर तसेच चमकदार होण्यासही मदत होईल.