‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर अन्नू क...

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर अन्नू कपूरची धक्कादायक प्रतिक्रिया : आमिर खानच्या संदर्भात म्हणतो, ‘हा काय प्रकार आहे? तो कोण आहे? (‘What Is That? Kaun Hai Wo’ Says Annu Kapoor On Aamir Khan’s Laal Singh Chaddha, Watch Video)

‘क्रॅश कोर्स’ या वेब सिरिजच्या प्रसारासाठी अन्नू कपूर माध्यम प्रतिनिधींसमोर आला असताना त्याला ‘लाल सिंह चड्‌ढा’ हा चित्रपट व त्याचा नायक आमिर खान यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा अन्नू कपूरने दिलेल्या उत्तरावरून सारेच चकित झाले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अन्‌ लोक तर्क करू लागले की, अन्नू आमीर खानवर नाराज आहे की काय?

‘लाल सिंह चड्‌ढा’ वरून आधीच बरेच वाद निर्माण झाले असल्याने त्याबाबत एका पत्रकाराने अन्नूकडे विचारणा केली. तर अन्नू म्हणाला, ‘हा काय प्रकार आहे?’ आमीर खानचा नवा चित्रपट येऊ घातलाय्‌ असं पत्रकाराने सांगितल्यावर अन्नू बोलला – ‘मी चित्रपट पाहतच नाही. मला काहीच माहीत नाही.’ तेव्हा ‘नो कमेंटस्‌’ असं म्हणून टाक, असं अन्नूच्या मॅनेजरने त्याला सांगितले. तरी अन्नू बडबडला – ‘तसं नाही. नो कमेंटस्‌ वगैरे बोलायची काही गरज नाही. माझा किंवा अन्य कुणाचाही मी चित्रपट पाहतच नाही. तेव्हा तो कोण आहे, हे मला माहितच नाही…’

या व्हिडिओवर युजर्स बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी अन्नूला पाठिंबा दर्शविला आहे, तर काहींनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एक युजर म्हणाला, ‘तू चित्रपट पाहतच नाही तर मग फिल्म इंडस्ट्रीत काय करतोस?’ दुसरा एक म्हणतो, ‘अरे, आमीर खानला जगभरातले लोक ओळखतात, तुला कोण ओळखतो?’

आमीर खान अभिनीत ‘लाल सिंह चड्‌ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होईल. त्यामध्ये करीना कपूर त्याची नायिका आहे.