सिंगींग बाऊल म्हणजे काय? (What Is A Singing Bowl?)

सिंगींग बाऊल म्हणजे काय? (What Is A Singing Bowl?)

सिंगींग बाऊल्स म्हणजे काय? कोणत्या समस्येवर उपाय म्हणून हे बॉल्स वापरले जातात?
– स्नेहा, नाशिक
उत्तर : सिंगींग बाऊल म्हणजे सोने, चांदी, तांबे, टिन, लोखंड, शिसं, आणि जस्त आदी धातुंनी बनवलेलं एक विशेष बाऊल (वाटी) असते. यातील प्रत्येक धातूचा एक विशिष्ट उद्देश असतो आणि ते सूर्य, चंद्र आणि अन्य ग्रहांचे प्रतिनिधित्त्व करतात. घरातील लहरी अधिक सुधारण्यासाठी सिंगींग बाऊल्सचा वापर केला जातो. याच्या वापराने घरातील ऊर्जा शुद्ध होते. तसेच कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम व जिव्हाळा वाढण्यास मदत होते. सिंगींग बाऊलचा उपयोग करताना ते कपड्याच्या गुंडाळीवर ठेवावे. त्यामुळे बाऊल मधून येणारा आवाज जास्त काळ राहतो. लाकडाच्या छोट्याशा काठीने बाऊलच्या काठावर हलकासा प्रहार करून डावीकडून उजवीकडे फिरवावे. त्यातून निघणारा मधुर आवाज आणि लहरी घरात पसरल्याने पवित्र वातावरणाची निर्मिती होते.

What Is A Singing Bowl


आमच्या घरात नेहमी मुलांमध्ये आणि आमच्यात वाद होत असतात. घरातील कलहाचे वातावरण शांत व्हावे याकरिता फेंगशुईची कशी मदत घेता येईल?
– सुरभि, मुंबई
नैऋत्य दिशा ही नातेसंबंध सुधारण्यासाठी तसेच नातेसंबंध अधिक विकसित होण्यासाठी अतिशय महत्त्वाची दिशा आहे. जर तुम्हाला मुलांसंबंधी चिंता असेल तर तुम्ही मुलांच्या तत्वापुढील येणार्‍या विकास चक्रानुसार वस्तुंची मांडणी पश्चिम दिशेला करा. नैऋत्य दिशेला कुटुंबातील सर्व व्यक्तींचा एकत्रित असा हसरा फोटो लावा. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तिंमधील वाद व कलह मिटण्यामध्ये मदत होते. नैऋत्य दिशेला भरपूर प्रकाश असावा व स्फटिकांचे गोळे टांगावेत.

What Is A Singing Bowl

संतानप्राप्तीवर आपलं घर वा बेडरूमच्या जागेचा प्रभाव राहतो का? याबाबत थोडी माहिती द्या.
– जान्हवी, डहाणू
होय. आपला बेडरूम नैऋत्य दिशेला असावा. त्यामुळे कर्त्यापुरुषाचा घरावर ताबा राहतो. नैऋत्य दिशा ही नातेसंबंधाची दिशा असल्यामुळे पती-पत्नींचे संबंध अधिक प्रेमळ व चांगले होतात. संतानप्राप्तीसाठी पती-पत्नींचे संबंध सुदृढ असणे अतिशय गरजेचे असते. तसेच पश्चिम दिशा ही मुलांची किंवा संततीची दिशा आहे. गुलाबी क्वार्ट्ज स्फटिकांचा गुच्छा आपल्या बेडरुममध्ये नैऋत्य दिशेला टांगा. यामुळे संतानप्राप्ती व पती-पत्नीचे संबंध अधिक चांगले विकसित होतात.

What Is A Singing Bowl


फेंगुशुईद्वारे उपायांत घराची कुंडली बनविली जाते, म्हणजे नेमके काय केले जाते?
– अपर्णा, डोंबिवली
फेंगशुईद्वारे समुपदेशन करताना त्या घरात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे जन्म साल पाहिले जाते. त्या जन्मसालावरून त्यांचा कुआ नंबर (भाग्यांक) काढला जातो. त्या कुआ नंबरवरून त्यांच्या चांगल्या आणि वाईट दिशा कळतात. ती व्यक्ती कुठल्या तत्वाची आहे हे कळतं. त्यांना शुभ असलेले रंग कोणते ते कळते. अशा अनेक गोष्टी जन्मसालावरून काढता येतात. या सर्व गोष्टींची शास्त्रोक्त मांडणी केली जाते. यालाच घराची कुंडली बनवणे म्हणतात.