कंडोमला पर्याय गर्भ निरोधक गोळ्या आहेत (What Ar...

कंडोमला पर्याय गर्भ निरोधक गोळ्या आहेत (What Are The Options To Condom?)

आमच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. आम्ही कुटुंब नियोजन करीत असल्याने माझे पती कंडोमचा वापर करतात. परंतु, त्याच्याने आता समाधान वाटत नाही, असे माझ्या पतीचे म्हणणे आहे. कंडोम शिवाय अन्य काही गर्भनिरोधक साधने आहेत का? कृपया कळवा.
– स्मिता, वसई

पुरुषांसाठी कंडोम शिवाय अन्य काही साधन नाही. महिलांसाठी काही ठिकाणी कंडोम मिळतात. पण त्याची खात्री देता येत नाही. मात्र गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही स्वतः दररोज गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकता. चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही या गोळ्यांचे सेवन करा. मात्र त्या गोळ्या नियमितपणे घेतल्या पाहिजेत.

गर्भ निरोधक गोळ्या, Options To Condom