कियारा अडवणीला सेक्सपेक्षा या तीन गोष्टी आहेत प...

कियारा अडवणीला सेक्सपेक्षा या तीन गोष्टी आहेत प्रिय ( what Are The Favourite Things Of Kiara Advani Other Than Sex)

कबीर सिंह, शेरशाह, गुड न्यूज आणि काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला भूल भुलैया २ या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कियारा अडवाणी सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाली आहे. कियारा ३० वर्षांची असून तिचा जन्म ३१ जुलै १९९२ मध्ये मुंबईत झाला. कियारा अडवाणीच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.एकापेक्षा एक चित्रपट देऊन कियारा अभिनेत्रींमध्ये टॉपच्या स्थानावर जात आहे.

कियाराचे खरे नाव आलिया असे आहे. पण सलमान खानच्या सल्ल्यावरुन तिने आपले नाव बदलले. कारण सिनेइंडस्ट्रीत आधीपासूनच एक आलिया आहे. कियाराने आपल्या फिल्मी करीअरची सुरुवात २०१४ मध्ये आलेल्या फुगली या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिने देवी हे पात्र साकारले होते. त्यानंतर तिने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये काम केले. त्यानंतर तिने कबीर सिंह, लक्ष्मी, गुड न्यूज, शेरशाह आणि भूल भुलैया २ यांसारख्या चित्रपटात काम केले.

या चित्रपटांमधील तिच्या अदा आणि अभिनयाने तिने असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली. लक्ष्मी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कियाराने तिला सेक्सपेक्षा कशात जास्त मजा वाटते ते सांगितले. कियारा आणि अक्षयने लक्ष्मी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. एका पत्रकाराने कियाराला, तुला सेक्सपेक्षा जास्त कोणत्या तीन गोष्टी आवडतात? असा प्रश्न विचारला.

प्रश्न थोडा विचित्र होता पण तरीही कियाराने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. कियाराने उत्तर देत म्हटले की, मला सेक्सपेक्षा जास्त पिझ्झा, शॉपिंग आणि एक चांगला चित्रपट या तीन गोष्टी खूप आवडतात. कियाराच्या मते सेक्सपेक्षा पिझ्झा, शॉपिंग आणि एखादा चांगला चित्रपट तिला जास्त आनंद देतो. त्यावेळी कियाराच्या या उत्तराची बरीच चर्चा झालेली.

कियाराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास कार्तिक आर्यनसोबतच्या भूल भुलैया २ नंतर ती वरुण धवनसोबत ‘जुग जुग जियो’या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर, नीतू कपूरसुद्धा होते. कियाराचा हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.