अंगप्रदर्शक कपडे घालून टीकेची धनी ठरलेल्या कंगन...

अंगप्रदर्शक कपडे घालून टीकेची धनी ठरलेल्या कंगना रणावतचा पलटवार, ती म्हणते, ‘महिलांनी काय घालावं व काय विसरावं ही त्यांची मर्जी आहे.(‘What a woman wears or forgets to wear is entirely her business’ Kangana Ranaut defends women’s rights with throwback pics, Gets brutally trolled)

कंगना रणावत सध्या आपल्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाशी संबंधित अपडेट्स ती शेअर करत असते. याशिवाय ती अनेकदा सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करते. आता पुन्हा एकदा कंगनाने अशी पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे युजर्स तिला ट्रोल करत आहेत.

कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगना पारदर्शक ब्रालेट आणि पांढर्‍या पँटमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत कंगनाने महिलांचे हक्क आणि स्वातंत्र्य याविषयी माहिती दिली आहे. यासोबतच आउटफिटवरुन ट्रोल करणाऱ्या लोकांना तिने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ” महिला काय परिधान करतात आणि काय घालायला विसरतात हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे…आणि मला हेच लक्षात आणून द्यायचे आहे.

त्याच आउटफिटमध्ये कंगनाने आणखी एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “मला वाटते की मी माझे म्हणणे मांडले आहे, आता मी ऑफिसला जाऊ शकते, बाय.”

लोक या पोस्टमुळे कंगनाला टार्गेट करत आहेत कंगनाला टॅग करुन लोक तिला ढोंगी म्हणत आहेत तर काही जण उर्फी आंटी म्हणत आहेत.

एका युजरने लिहिले की, “जर दुसरे कोणी हे परिधान केले असते तर दीदींना हिंदू धर्म, संस्कृती आणि खूप काही आठवले असते.” तर दुसर्‍या युजरने लिहिले की, “ही तीच आहे जिने उर्मिला मातोंडकरला रिवीलिंग आऊटफिट घातल्यामुऴे पोर्नस्टार म्हटले होते..” आणखी एका युजरने, “ही तीच दीदी आहे जी रिहानाला आपल्या संस्कृतीचे धडे देत होती.” आणखी एका युजरने म्हटले आहे की, “अगं बावळट, जगातील लोकांना धडा शिकवण्यासाठी स्वतःला कपडे काढून दाखवण्याची गरज आहे का?”

नुकतीच कंगना आपल्या साडी लूक आणि बॅगमुळे चर्चेत आली होती. तिने कोलकाता येथून 600 रुपयांना विकत घेतलेली साडी नेसली होती. याबद्दल तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर माहिती दिली होती.