नव्वदीच्या दशकातील नट्यांची चित्रविचित्र फॅशन, ...

नव्वदीच्या दशकातील नट्यांची चित्रविचित्र फॅशन, जी पाहून आता येतं हसू… (Weird Bollywood Fashion Trends From The 90s)

हेअरस्टाईल : नव्वदीच्या काळातील नट्यांची हेअरस्टाईल म्हणजे डोक्यावर पक्ष्यांचं घरटं ठेवलं आहे, असं वाटत असे. पण तेव्हा ही नवीन फॅशन आहे, असं समजलं जातं होतं. अन्‌ आपली ही स्टाईल त्या नट्या बऱ्याच चित्रपटांमधून रिपीट करत होत्या. इतकंच नव्हे तर दोन वेण्या किंवा पोनी टेल बनविण्याची फॅशन होती. जी आता बालिशपणाची वाटते.

ज्वेलरी : तेव्हाच्या अभिनेत्री इतके दागिने घालत की, ती चालतेबोलते ज्वेलरीचे दुकान वाटावे. घरात जे काही आहे, ते सगळं घातल्यागत वाटत होतं. डोक्यापासून पायापर्यंत विचित्र अशा चमकदार दागिन्यांनी त्या स्वतःला मढवून घेत. मध्यंतरी एक ट्रेंड तर असा आला होता की, या कलावती कानात मोठमोठ्या प्लास्टीकच्या घालत असत.

हेअर ॲक्सेसरीज्‌ : याशिवाय हेअर ॲक्सेसरीज्‌ देखील मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असत. त्यामुळे त्या अभिनेत्री सुंदर दिसण्याऐवजी एलियन लूक वाटत होत्या.

हास्यास्पद कपडे : त्या काळात या कलावती जे कपडे घालत होत्या, ती स्टाईल आता हास्यास्पद वाटते. काय घातलंय्‌ आणि कशाला घातलंय्‌, असे त्यांचे कपडे होते.

भयानक मेकअप – लाल, गुलाबी आणि चमकदार रंगांचा ग्लॉसी मेकअप्‌ करण्यात त्या धन्यता मानत होत्या. आता तो मेकअप पाहिला की भीती वाटते.

जिन्स, मिडीज्‌ आणि डंगरीज्‌ : यांचे रंग आणि फिटिंग विचित्र दिसत होते. बड्या, आघाडीच्या अभिनेत्री स्टाईल आयकॉन समजल्या जाणाऱ्या पेहरावात वावरत होत्या. सिनेमामध्ये त्या जे कपडे घालत होत्या, त्याचा तेव्हा एक ट्रेंड सेट केला जात होता. केवळ डेनिमच नव्हे तर मिडीज्‌ देखील अजब प्रकारे घातले जात होते. त्यांची रंगसंगती आणि स्टाईल फारच विचित्र होती.

रेखा एरव्ही बरीच ग्लॅमरस्‌ असली तरी तिने त्या काळच्या चित्रपटात असे विचित्र लूक्स घेतले होते की, त्याला ओव्हरडनपेक्षा वेगळं काही म्हणताच येणार नाही. मेकअप, कपडे, ॲक्सेसरीज्‌, हेअर स्टाईल – सगळं विचित्र होतं.