वजन कमी करण्याचे सोपे उपाय (Weight loss tips)

वजन कमी करण्याचे सोपे उपाय (Weight loss tips)

हल्ली वेटलॉसची क्रेझ आहे. जो-तो वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावताना दिसत आहे. शरीर प्रमाणबद्ध असायलाच हवं. आरोग्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. पण म्हणून वजन कमी करण्यासाठी कोणतंही क्रॅश डाएट करू नका. त्यापेक्षा हे सोपे आणि फायदेशीर उपाय आजमावून पाहा.
– 1 ग्लास पाण्यामध्ये 2 टीस्पून अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि पाव टीस्पून दालचिनी पूड मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. हे पेय दिवसातून दोन वेळा प्या.
– 1 ग्लास पाण्यामध्ये 2 टीस्पून मध आणि 2 टीस्पून अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. हे पेय नियमितपणे प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
– 3 टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून मध आणि 1 टीस्पून काळी मिरी पूड एक ग्लास पाण्यामध्ये मिसळा. रोज सकाळी उपाशी पोटी हे पेय प्या. असं किमान तीन महिने नियमितपणे करा.
– यासोबत नियमित व्यायाम, योग आणि ध्यानधारणा केल्यासही दुप्पट लाभ होतो.
– आपल्या आहारात आरोग्यदायी अन्नघटकांचा समावेश करा.
– जंक फूड, तेलकट पदार्थ खाणं टाळा.
– साजूक तुपाचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करा. कारण हे आरोग्यदायी फॅट्स आहेत. मात्र म्हणून त्यांचं अतिरिक्त सेवन करू नका.
– आहारात लिंबाचा नियमितपणे समावेश करा. सॅलेडवर लिंबाचा रस पिळा किंवा जेवणानंतर लाइम शॉट प्या.
– काळी मिरी पूडही सॅलेडवर भुरभुरा.
– मधही आरोग्यदायी आहे. तसंच ते वजन कमी करण्यासही अतिशय उपयुक्त आहे.
– उपाशी राहू नका. बरेचदा लोक पटकन वजन कमी व्हावं, यासाठी खाणं-पिणं सोडून देतात. असं करू नका. यामुळे अशक्तपणा येतो आणि फॅट्सही कमी होत नाहीत.
– वास्तववादी ध्येय बाळगा. एका आठवड्यात पाच किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. महिन्याभरात एक किलो वजन कमी झालं, तरी हरकत नाही. तेही फायद्याचंच आहे.