करीना कपूरमुळे सुरु झाली होती ऐश्वर्या राय आणि ...

करीना कपूरमुळे सुरु झाली होती ऐश्वर्या राय आणि सलमान खानची प्रेमकहाणी…. (Was Aishwarya Rai and Salman Khan’s love story started because of Kareena Kapoor, know this interesting Story)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे संपूर्ण जगभर चाहते आहेत. एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे अफेअर इंडस्ट्रीत गाजले होते. सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके सनमच्या सेटवर सुरू झाली होती. पण याचे निमित्त बेबो म्हणजेच करीना कपूर खान ठरली असे म्हटले जाते.

1994 मध्ये ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. मिस वर्ल्डचा मुकुट धारण केल्यानंतर ऐश्वर्याने जेव्हा चित्रपटांमध्ये पदार्पण केले तेव्हा सुरुवातीला तिला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. बॉबी देओलसोबत ‘और प्यार हो गया’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. यानंतरही तिने अनेक चित्रपट केले, मात्र तेही फारसे चालले नाहीत.

त्यानंतर ऐश्वर्या राय आणि सलमान खान ही जोडी 1999 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि पाहता पाहता ऐश्वर्या यशाच्या शिखरावर पोहचली. या चित्रपटामुळे ऐश्वर्याला इंडस्ट्रीत ओळख मिळाली.

या चित्रपटातून ऐश्वर्याला बॉलिवूड इंडस्ट्रीत ओळख तर मिळालीच पण सोबतच ती सलमान खानच्या प्रेमात सुद्धा पडली. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि खऱ्या आयुष्यात ही जोडी अनेकदा एकत्र दिसू लागली. मात्र, करीना कपूर नसती तर कदाचित या चित्रपटातून सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी सुरू झाली नसती.

‘हम दिल दे चुके सनम’साठी संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती ऐश्वर्या नसून करीना कपूर होती. यासाठी त्यांनी करीनासमोर चित्रपटाचा प्रस्तावही ठेवला होता.  मात्र काही कारणास्तव करीनाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला, त्यानंतर ऐश्वर्या रायला या चित्रपटासाठी साइन करण्यात आले. त्यामुळे जर करीना कपूरने या चित्रपटाला होकार दिला असता तर कदाचित सलमान आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली नसती असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

याशिवाय ‘देवदास’ चित्रपटातील पारोच्या भूमिकेसाठी संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती करीना कपूर होती असेही म्हटले जाते. या चित्रपटासाठी करीनाने स्क्रीन टेस्टही दिली होती, पण त्यानंतर ऐश्वर्याला चित्रपटात घेण्यात आले. हा चित्रपट पडद्यावरही ब्लॉकबस्टर ठरला आणि ऐश्वर्या रायचे पारो हे पात्र सर्वांच्या कायम लक्षात राहिले.