विवेक ऑबेरॉयने करीना कपूरला कॉलेजमध्ये केली होत...

विवेक ऑबेरॉयने करीना कपूरला कॉलेजमध्ये केली होती मदत (Vivek Oberoi Has Done A Favor To Kareena Kapoor, This Is How He Helped The Actress In College)

कपूर घराण्याची मुलगी आणि पतौडी घराण्याची सून करीना कपूरही इन्डस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. माहेर आणि सासर दोन्हीकडून गडगंज श्रीमंत असलेल्या करीनाला कधी कोणाच्या मदतीची गरज लागली होती असे म्हटल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण ते खरं आहे. करीना कपूर जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती, तेव्हा तिला कोणाच्या तरी मदतीची गरज होती आणि त्या वेळी बेबोला अभिनेता विवेक ओबेरॉयशिवाय कोणीही मदत केली नाही.

विवेक ओबेरॉय आणि करीना कपूर खान हे मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये शिकायचे. विवेक ओबेरॉय करीनाला 3 वर्षांनी सिनियर होता. कॉलेजच्या दिवसांत लेक्चरला करीना कपूरची उपस्थिती कमी असायची. त्यावेळी तिला तिची उपस्थिती सुधारण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची गरज होती, त्यामुळे विवेक ओबेरॉयने बेबोला यात मदत केली होती.

एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विवेक ओबेरॉयने या घटनेची आठवण करून दिली आणि म्हणाला, “मला आठवते की बेबो कॉलेजमध्ये नवीन आली होती. मी तिचा सिनियर होतो. बेबो फारशी लेक्चरला नसायची त्यामुळे बरेचदा तिची अनुपस्थिती लागायची. त्यावेळी मी तिला म्हणालो होतो की काळजी करू नको, मी काहीतरी करेन. त्यानंतर तिची संपूर्ण माहिती घेऊन मी तिची हजेरी लावली होती.  

विवेक पुढे म्हणाला, “जेव्हा बेबोने पाहिले की आपली उपस्थिती लावण्यात झाली आहे, तेव्हा तिला खूप आनंद झाला. ती मला म्हणाली तू हे कसं केलंस? तेव्हा मी म्हणालो आनंदी राहा आणि मजा कर.

विवेक ओबेरॉय देखील फिल्मी घराण्यातील आहे. तो ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे. याच कारणामुळे करीना आणि तो दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. याशिवाय विवेक आणि करीनाने ‘ओंकारा’, ‘युवा’ आणि ‘कुर्बान’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

विवेक ओबेरॉयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो ‘धारावी बँक’ या वेब सीरिजमध्ये दिसत आहे. नुकतीच ही सिरीज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमध्ये विवेक ओव्हरॉयशिवाय ‘सुनील शेट्टी’ देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय विवेक ‘इंडियन पोलिस फोर्स’ नावाच्या वेब सिरीजमध्येही दिसणार आहे.