विवेक अग्निहोत्रीने नाव न घेता साधला करण जोहरवर...

विवेक अग्निहोत्रीने नाव न घेता साधला करण जोहरवर निशाणा (Vivek Agnihotri slams Karan Johar for leaving Twitter, Calls him hypocrite and fake)

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. करण कधी त्याच्या कामाबद्दल तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत ट्रोल होत असतो. अलीकडेच, ब्रह्मास्त्र चित्रपटावर बहिष्काराची मागणी होत असताना त्याला सुद्धा ट्रोल केले गेले. याशिवाय त्याचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ देखील खूप ट्रोल झाला होता. कदाचित याच कारणामुळे दोन दिवसांपूर्वी करणने ट्विटरला अचानक ‘गुड बाय’ म्हटले. करण जोहरने आपल्या शेवटच्या ट्विटद्वारे ही माहिती देत लिहिले – मी आणखी सकारात्मक उर्जेसाठी जागा तयार करत आहे आणि हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. गुडबाय ट्विटर!

या निर्णयानंतर करण पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. युजर्ससोबतच ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही करण जोहरवर निशाणा साधला आहे. एकामागून एक ट्विट करत त्यांनी करणच्या या वागण्याला खोटे ठरवले आहे.

विवेक अग्निहोत्रीने ट्विट करत करण जोहरला टोला लगावला. या ट्विटमध्ये त्यांनी करणचे नाव घेतले नसले तरी त्यांचे ट्विट वाचून ते करण जोहरलाच लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. करण जोहरची खिल्ली उडवत विवेक अग्निहोत्री यांनी यापूर्वी ट्विट केले होते की, “विजेते कधीही हार मानत नाहीत आणि जे हार मानतात ते कधीही जिंकत नाहीत.”

यानंतर विवेक अग्निहोत्रीने आणखी एक ट्विट केले, त्यावरुन ते करण जोहरला टार्गेट करत असल्याचे स्पष्ट झाले. दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “मला वाटते की जर एखादी व्यक्ती खरोखरच सकारात्मक उर्जेच्या शोधात असेल तर तो फक्त ट्विटरच नव्हे तर सोशल मीडिया पूर्णपणे सोडून देईल. तुम्ही ट्विटर सोडले कारण तुमचा ढोंगीपणा आणि खोटेपणा इथे चालत नाही. पण इंस्टाग्रामवर राहणे हे दाखवते की तुम्ही किती खोटे बोलत आहात, कारण तिथूनच तुम्हाला ब्रँड मिळतात आणि ते सोडणे तुमच्यासाठी फायदेशीर नाही.”

विवेक अग्निहोत्रींचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहेत आणि लोक त्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. काही युजर्स विवेक अग्निहोत्रींचे समर्थन देत ट्विटवर करण जोहरला ट्रोल करताना दिसत आहेत, तर काहीजण करण जोहरचे समर्थन करत यात चूक काय आहे? असा प्रश्न विचारत आहेत.

विवेक अग्निहोत्री गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडला टार्गेट करत आहे. अलीकडेच एका जाहिरातीसाठी त्यांनी आमिर खानची शाळा घेत त्याला इडियटही म्हटले होते. याशिवाय ते सातत्याने मोठ्या निर्मात्यांविरोधात आपले मत मांडत असतात.