विशाल निकमचे सेटवरच वर्कआऊट (Vishal Uses Set Pr...

विशाल निकमचे सेटवरच वर्कआऊट (Vishal Uses Set Property For Workout)

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेत ज्योतिबाची भूमिका करणारा कलाकार आहे विशाल निकम. तो या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो आहे. या भूमिकेसाठी शरीर बलवान आणि सुदृढ राहणं आवश्यक असल्याने त्याला वर्कआऊटची गरज आहे. पण शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला वर्कआऊटसाठी जिममध्ये जायला वेळ मिळत नाही. म्हणून त्यानं मालिकेच्या सेटवरच वर्कआऊट सुरु केलं आहे. तो तिथेच व्यायाम करतो. शिवाय लाईट्‌ससाठी वापरण्यात येणारी वजने, स्टॅन्डस्‌ घेऊन नियमित वर्कआऊट करतो.

आपल्या या फिटनेसच्या प्रेमाविषयी सांगताना विशाल म्हणाला, मी ज्योतिबाच्या भूमिकेसाठी १२ किलो वजन वाढवलं होतं. शूटिंगच्या वेळापत्रकातून हे वजन कायम राखणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे. म्हणून मी इथे उपलब्ध असलेल्या वस्तुंचा वजन म्हणून वापर करतो नि व्यायाम करतो. या सेटवर माझी खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली जाते.

विशाल शाकाहारी आहे. दूध, मोड आलेली कडधान्ये, ताज्या भाज्या आणि फळं असा सकस आहार तो घेतो. सोबतीला असा दररोज व्यायाम करत असल्याने त्याला आपला फिटनेस राखणं शक्य झालं आहे.