वामिका आणि अनुष्काचा फोटो शेअर करत विराट कोहलीन...

वामिका आणि अनुष्काचा फोटो शेअर करत विराट कोहलीने त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांना दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा (Virat Kohli Writes An Emotional Message For Anushka Sharma And Daughter Vamika, Shares Adorable Photo Of New Born Girl For The First Time, Wishes Happy Women’s Day)

नुकतेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ असा जो विजय मिळवला आहे, त्यामुळे ‘आयसीसी’ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत भारताला अग्रस्थान तर मिळालं आहेच शिवाय कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात सलग १० वी कसोटी मालिका जिंकली आहे. या बातमीमुळे विराटचे सर्वत्र कौतुक केलं जात असतानाच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वामिका आणि अनुष्काचा फोटो शेअर करत कोहलीने देखील त्याच्या आयुष्यातील या दोन महत्त्वाच्या स्त्रियांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का आणि त्यांची मुलगी वामिका दिसत आहे. “एखाद्या बाळाचा जन्म पाहणे म्हणजे अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव आहे. ते पाहिल्यानंतर, तुम्हाला एका महिलेचे सामर्थ्य समजते, आणि परमेश्वरानं मातृत्वाचं वरदान स्त्रियांनाच का दिलं हे समजते. कारण त्या पुरूषांपेक्षा शक्तिशाली आहेत. माझ्या आयुष्यातील सगळ्यात उत्कट आणि दयाळू महिलेला आणि एक जी मोठी होऊन तिच्या आईसारखी होणार तिला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जगातील सर्व आश्चर्यकारक महिलांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा.” अशा आशयाची भावूक कॅप्शन विराटने या फोटोला दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूडमधील लाडकं कपल आहे. २०२१ च्या सुरुवातीलाच अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर विरुष्कानं त्यांच्या लेकीचं  नाव ‘वामिका’ ठेवल्याचं इन्स्टाग्रामवर जाहीर केलं. आणि आज वामिका व अनुष्का या माय-लेकींना महिना दिनाच्या शुभेच्छा देत विराटने जो संदेश दिला आहे, तो प्रत्येक पुरुषाने वाचला पाहिजे. नव्हे तर त्याचे त्यासाठी कौतुकच केले पाहिजे.