विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईतील रस्त्याव...

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईतील रस्त्यावर स्कूटी राइड करताना दिसले, उभयतांचे फोटो आणि व्हिडिओ होताहेत व्हायरल (Virat Kohli-Anushka Sharma Enjoy Scooty Ride In Mumbai Hiding Face By Helmet)

‘चक दे ​​एक्सप्रेस’ स्टार अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली, स्कूटीवर हेल्मेट वगैरे घालून मुंबईतील आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले परंतु तरीही चाहत्यांच्या आणि पापाराझींच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. हे सेलिब्रिटी जोडपे मढ आयलंडवर मस्त स्कूटी राईडचा आनंद घेत फिरताना दिसले.

राईडवर जाताना या स्टार जोडप्याने हेल्मेट घातले होते आणि कोणी ओळखू नये म्हणून तोंड झाकले होते.

पण हे स्टार कपल त्यांच्या चाहत्यांच्या आणि पापाराझींच्या नजरेतून सुटू शकले नाही आणि आता या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

खरं तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मढ आयलंडला गेले होते.

शूटिंग संपवून तेथून परतलेले हे जोडपे काळ्या रंगाच्या स्कूटीवर फिरताना दिसले. विराट आणि अनुष्काने काळे हेल्मेट घातले होते. कोणाच्या नजरेस पडू नये यासाठी दोघांनीही पूरेपुर काळजी घेतली होती. तरीही पापराझींपासून ते वाचू शकले नाही.

जेव्हा चाहत्यांनी आणि पापाराझींनी त्यांना ओळखले तेव्हा चाहते त्यांच्या मागे लागले. एका ठिकाणी थांबल्यानंतर अनुष्का आणि विराटने मीडियासमोर पोजही दिल्या.

स्कूटीवर स्वार होत असताना विरुष्काने मुंबईतील पावसाचा भरपूर आनंद लुटला. या कपलचे राइडिंग करतानाचे हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.