विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी लग्नान...

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच सुरु केला नवा व्यवसाय (Virajas Kulkarni And Shivani Rangole Start New Business Of Clothing)

माझा होशील ना फेम अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे हे काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर या दोघांनी एकत्र काही जहिरातींसाठी काम केले. आता त्यांनी एक नवा निर्णय घेतला आहे.

विराजस आणि शिवानीने एक नवा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांनी स्वत:चे क्लोथिंग ब्रॅण्ड सुरु केले आहे. या क्लोथिंग ब्रॅण्डमार्फत ते वेगवेगळे टीशर्ट विकणार आहे.

या टीशर्टची खासियत म्हणजे ते खास नाट्यप्रेमींसाठी तयार करण्यात आले आहेत. या टीशर्टवर नाटक, थिएटरसंबंधित संवाद किंवा मजकूर प्रिंट केले आहेत. विराजस आणि शिवानीने आपल्या क्लोथिंग ब्रॅण्डचे नाव विरानी असे ठेवले आहे.

विराजस आणि शिवानी यांना त्यांच्या नव्या व्यवसायासाठी सेलिब्रेटी तसेच चाहते शुभेच्छा देत आहेत. विराजसला महाविद्यालयापासूनच नाटकाचे वेड होते. त्यासाठी त्याने थिएटरऑन या नाट्यसंस्थेची 5 वर्षांपूर्वी स्थापना केली.

शिवाय शिवानीसुद्धा थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे तिला सुद्धा नाटकाविषयी अपार प्रेम आहे. त्यामुळेच या दोघांनी या विषयाला अनुसरुन हा क्लोथिंग ब्रॅण्ड सुरु केला. विराजसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो व्हिक्टोरिया या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत पुष्कर जोग, आशय कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.