अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्याचं...

अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं समर्थन (Vikram Gokhale Support Kangana Ranaut Statement)

अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं आहे. 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्यावतीने विक्रम गोखले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

“भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य भीक असून खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं,” असं कंगना राणावतने एका मुलाखतीत म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्याचं समर्थन करताना विक्रम गोखलेंनी म्हटलं, “कंगना रणौत जे म्हणाली आहे ते खरं आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलेलं आहे बरं का. ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही.”

नोव्हेंबरला टाइम्स नाऊ या खासगी वृत्त वाहिनीनं ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं नाव @75′ असं होतं. त्या कार्यक्रमात ‘बॉलिवूडचा जागतिक (ग्लोबल) परिणाम’ या मुद्द्यावर चर्चेसाठी कंगनाला बोलावण्यात आलं होतं.

त्यावेळी टाइम्स नाऊच्या संपादक नाविका कुमार यांना दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं सदर वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर कंगनानं स्पष्टीकरण दिलं होतं.

इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोत तिनं म्हटलंय, “या मुलाखतीत स्पष्टपणे सांगण्यात आले की स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे १८५७ मध्ये लढले गेले. मला १८५७ ची माहिती आहे पण १९४७ मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. जर कोणी या प्रकरणावर मला माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन, कृपया मला मदत करा.”

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. एवढंच काय तर तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणीही केली जात आहे. त्यातच मराठीतील ज्येष्ठे अभिनेते विक्रम गोखले यांन कगंणाच्या वक्तत्त्व्याचे समर्थन करून लोकांचा रोष पत्करला आहे.