करिश्मा कपूरच्या पहिल्या नवऱ्याच्या, पहिल्या बा...

करिश्मा कपूरच्या पहिल्या नवऱ्याच्या, पहिल्या बायकोशी, विद्युत जामवालचा झाला लपूनछपून साखरपुडा : नेहा धुपियाचा त्याला दुजोरा! (Vidyut Jamwal Gets Engaged To Nandita Mahtani… Neha Dhupia Confirms!)

धट्टाकट्टा अभिनेता विद्युत जामवाल आणि त्याची गर्लफ्रेंड नंदिता मेहतानी यांचे फोटो सोशल मीडियावर पसरले होते. दोघे ताजमहालच्या पार्श्वभूमीवर रोमॅन्टिक फेजमध्ये दिसले. अन्‌ नंदिताच्या बोटात एंगेजमेन्ट रिंग पण दिसली. त्यावरून या दोघांचा साखरपुडा झाला असावा, असे अंदाज वर्तविले जात होते. परंतु दोन-तीन दिवसांपूर्वी हा कार्यक्रम झाला असणार. कारण अभिनेत्री नेहा धुपियाने या दोघांचा फोटो शेअर करून त्यांचे अभिनंदन केले आहे. आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली बातमी, असं लिहून नेहाने या प्रकरणास दुजोरा दिला आहे.

Vidyut Jamwal, Nandita Mahtani

विद्युत आणि नंदिता शनिवारी ताजमहाल पाहायला गेले होते. दोघांनीही पांढरे कपडे घातले होते.

Vidyut Jamwal, Nandita Mahtani

विद्युत आणि नंदिता इन्स्टाग्राम वरून एकमेकांना संदेश पाठवत होते. त्यावरून त्यांच्यात प्रेम आहे. हे जाणवत होते. आपण नंदिताशी डेटिंग करत आहोत, या बातमीस विद्युतने जानेवारी महिन्यात जाहीर केले होते.

Vidyut Jamwal, Nandita Mahtani

नंदिता ही फॅशन डिझायनर आहे. बऱ्याच मान्यवरांचे ड्रेसेस ती डिझाइन करते. विशेष म्हणजे करिश्मा कपूरचा पहिला नवरा संजय कपूर याची नंदिता पहिली बायको आहे. त्यांचा घटस्फोट झाल्यावर संजय व करिश्माने लग्न केले होते. या क्षणी लोक विद्युत-नंदिताचे अभिनंदन करत आहेत.

Vidyut Jamwal, Nandita Mahtani

फोटो सौजन्य – (सर्व फोटो) इन्स्टाग्राम