विद्युत जामवालचा गर्लफ्रेंड नंदिता महतानीसोबत ब...

विद्युत जामवालचा गर्लफ्रेंड नंदिता महतानीसोबत ब्रेकअप ? साखरपुड्यानंतर दोन वर्षांनी आला नात्यात दुरावा (Vidyut Jammwal Breaks Up With Girlfriend Nandita Mahtani After Being Engaged For Two Years?)

 सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत जामवाल आणि नंदिता महतानी यांचे ब्रेकअप झाले आहे. दोन वर्षांपूर्वी अभिनेता विद्युत जामवाल याने सोशल मीडियावर फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबतच्या साखरपुड्याची गोड बातमी शेअर केली होती.

आयएएनएसच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्शन सीन्सद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता विद्युत जामवाल आणि फॅशन डिझायनर नंदिता महतानी यांनी त्यांचे नाते तोडले आहे. दोन वर्षांपूर्वी विद्युत जामवालने फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबत एंगेजमेंट केली होती. बरेच दिवस चाहते त्यांच्या लग्नाच्या तारखेची वाट पाहत होते.

अभिनेता विद्युत जामवाल आणि नंदिता महतानी काल डायन पांडेच्या मुलीच्या हळदी समारंभात दिसले. यादरम्यान दोघेही एकमेकांना टाळत होते.

या सोहळ्यादरम्यान विद्युत आणि नंदिता यांनी एकमेकांपासून अंतर ठेवले होते. हे अंतर पाहून विद्युत आणि नंदिता वेगळे झाल्याचा अंदाज सोशल मीडिया युजर्स लावत आहेत.

फॅशन डिझायनर नंदिता महतानी घटस्फोटित आहे. विद्युतने 2021 मध्ये आग्रा येथील ताजमहाल येथे नंदितासोबत एंगेजमेंट केली आणि नंतर विद्युतने ही गुड न्यूज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी शेअर केली, एंगेजमेंटचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.

पुन्हा एकदा विद्युत आणि नंदिताच्या ब्रेकअपच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहेत. पण आता दोघांच्या विभक्त होण्याच्या या बातमीने चाहत्यांची निराशा केली आहे.