विद्या बालनचे केवळ कागद लपेटलेले टॉपलेस फोटोशूट...

विद्या बालनचे केवळ कागद लपेटलेले टॉपलेस फोटोशूट व्हायरल (Vidya Balan’s nude photoshoot covering her body with newspaper goes viral, Netizens comment- Dirty Picture returns)

विद्या बालन ही बॉलिवूडची एक उत्तम अभिनेत्री आहे. ती नेमक्या चित्रपटांमध्येच काम करते पण त्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाने प्रत्येकाची मने जिंकून घेते.याशिवाय तिने ‘इश्किया’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ सारख्या चित्रपटांमध्येही बोल्डनेसची अदा सुद्धा दाखवली होती.  

अलीकडेच विद्याने न्यूड फोटोशूट केले आहे, तिच्या या फोटोंमुळे इंटरनेटवरील तापमान वाढले आहे. नेहमी साडीत दिसणार्‍या या अभिनेत्रीचा असा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

विद्या बालनचा एक अतिशय बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात विद्या बालनचे टॉपलेस फोटोशूट दिसत असून तिने वृत्तपत्राने आपले शरीर झाकले आहे. हातात चहाचा कप धरून ती कॅमेरासमोर पोज देत आहे. या फोटोतील  अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिची स्टाईल पाहून चाहते डर्टी पिक्चरचा सीक्वल बनवतोय का, अशी प्रतिक्रिया कमेंट करून देत आहेत.

विद्या बालनचा व्हायरल फोटो हा अभिनेत्रीने सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी केलेले फोटोशूटपैकी एक होता. हा फोटो 2015 मधील म्हणजेच सुमारे 8 वर्षे जुना आहे. आता 8 वर्षांनंतर डब्बू रतनानीने पुन्हा हा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.