रणवीर सिंहच्या नग्न छायाचित्रांबद्दल विद्या बाल...

रणवीर सिंहच्या नग्न छायाचित्रांबद्दल विद्या बालनची पाठराखण ( Vidya Balan Supports Ranveer Singh For His Nude Photo shoot)

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी मात्र त्याने कपडे न घालता शूट केल्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ माजला आहे. रणवीरच्या या न्यूडशूटने सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे. पण त्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.

मुंबई, इंदौरसारख्या शहरात तर त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली गेली आहे. काही ठिकाणी तर रणवीरला कपडेदान करण्याचे अभियान चालवले जात आहे. पण बॉलिवूडचे काही कलाकार मात्र रणवीरच्या फोटोशूटला समर्थन देत आहेत. आतापर्यंत आलिया भट्ट, अर्जून कपूर, राम गोपाल वर्मा, सुमोना चक्रवर्ती यांसारख्या अनेक कलाकारांनी रणवीरच्या फोटोशूटला पाठींबा दिला आहे.

अभिनेत्री विद्या बालन इंडस्ट्रीमध्ये दिलखुलास बोलण्यासाठी ओळखली जाते.रणवीर सिंहच्या न्यूडशूटवरुन बाहेर गदारोळ माजला असताना विद्या बालने यावर, यात त्रास काय ? असे म्हटले आहे. 

विद्या बालन ओपन बुक या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेली होती. त्यावेळी तिथे तिला रणवीर सिंहबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांना उत्तर देताना तिने रणवीरला पाठींबा दिला. तिने हसत उत्तर दिले की, यात त्रास काय? पहिल्यांदा असं कोणी तरी करत आहे तर आम्हाला पण नेत्रसुख मिळू दे ना.

त्यानंतर तिला रणवीर विरोधात एफआयआर नोंदवल्याबद्दल विचारण्यात आले त्यावर तिने म्हटले की, असे वाटते एफआयआर नोंदवणाऱ्यांकडे इतर कोणती कामे नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींवर वेळ वाया घालवत आहेत. तुम्हाला जर हे आवडत नसेल तर पेपर फेकून द्या, बंद करा, किंवा काय करायचयं ते करा. पण या एफआयआरच्या वगैरे भानगडीत का पडायचे ?