फिल्ममेकर गुनीत मोंगा आणि सनी कपूर यांच्या प्री...

फिल्ममेकर गुनीत मोंगा आणि सनी कपूर यांच्या प्री वेडिंग कॉकटेल पार्टीमध्ये विद्या बालन झाली ऊप्स मोमेंटची शिकार (Vidya Balan oops moment in guneet monga and sunny kapoor’s pre wedding party)

फिल्ममेकर गुनीत मोंगा आणि सनी कपूर यांची प्री वेडिंग कॉकटेल पार्टी नुकतीच मुंबईत पार पडली. या पार्टीत अनेक बॉलीवूडकरांनी हजेरी लावली होती. कोंकणा सेन शर्मा, विशाल खेशल, करण जोहर, भावना पांडे, संजय कपूर, माहीप कपूर आणि इतर अनेकजण उपस्थित राहिले होते. या पार्टीत विद्या बालन देखील आपला पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत पोहोचली होती. त्यावेळी पापाराझीला फोटोसाठी पोझ द्यायला जात असतानाच तिच्यासोबत लाजिरवाणी गोष्ट होता होता राहिली, म्हणजे तिनं हुशारीनं सगळं सावरलं.

व्हायरल व्हिडीओत तर दिसत आहे की तिची साडी सुटता सुटता राहिली. त्याचं झालं असं की, विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत गुनीत मोंगाच्या कॉकटेल पार्टीला पोहोचली होती. यावेळी तिनं नेहमी प्रमाणेच सुंदर साडी नेसली होती. कार्यक्रम स्थळी जिथनं एन्ट्री करायची होती तिथं काहीजण उभे होते अन् मीडियाची गर्दी देखील होती. त्याचवेळी अचानक एका व्यक्तीच्या हातात विद्याच्या साडीचा पदर अडकला अन्‌ त्यामुळे तिच्या सुळसुळीत साडीच्या प्लेट्सही खोलल्या गेल्या.

पण विद्या साडी नेसण्यात आता सराईत असल्यामुळे तिनं पटकनं चपळाईनं सुटणाऱ्या साडीला सावरलं आणि लगेचच फोटोसाठी पोझ देण्यासाठी उभी राहिली. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्‌स दिल्या आहेत. अनेकांनी विद्याचा पदर खेचत नेणाऱ्या त्या व्यक्तीला ट्रोल केले आहे. त्याने जाणूनबुजून पदर खेचला असे त्यांचे म्हणणे आहे. तर काहींनी ती व्यक्ती सतीश कौशिक असल्याचे असल्याचं म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे. पदर खेचला गेल्यानंतर त्याने विद्याची माफी मागायला हवी होती, असे चाहत्यांनी म्हटले आहे.