स्कॉटलंडमध्ये चित्रित झालेला रहस्यमय मराठी चित्...

स्कॉटलंडमध्ये चित्रित झालेला रहस्यमय मराठी चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ (‘Victoria’ Is A Suspense Marathi Movie Shot In Scotland)

ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या  यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.

पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका असलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झालेले आहे. हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे .

जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.

तसेच अभिनेता  पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णीसह हा तिसरा चित्रपट आहे. या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत .

आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माता आहेत .