विकी कौशलने पत्नी कतरीनाबद्दल उधळली स्तुती सुमन...

विकी कौशलने पत्नी कतरीनाबद्दल उधळली स्तुती सुमनं, म्हणाला ती चालती फिरती डॉक्टर आहे (Vicky Kaushal Praised Wife Katrina, Said- She Is A Walking Doctor)

विकी कौशल आणि कतरीना कैफ यांची जोडी बॉलिवूडमधील सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. त्यांचे असंख्य चाहते आहेत. ते जेव्हा एकत्र बाहेर पडतात तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात. अलीकडेच विकी कौशलने कतरीना कैफचे एका कार्यक्रमादरम्यान कौतुक केले.

एका कार्यक्रमादरम्यान विकी कौशलने कतरीना कैफला शास्त्रज्ञ आणि चालती फिरती डॉक्टर म्हणून संबोधले. विकी कौशलला त्याच्या तब्येतीबद्दल काही प्रश्न विचारले तेव्हा सुद्धा त्याने कतरीनाचे कौतुक करण्याची एक संधी सोडली नाही.

विकी म्हणाला की, “माझ्यासाठी आरोग्याचा अर्थ मानसिक आरोग्यापासून सुरू होतो. मला वाटते की त्यानंतर सर्वकाही येते. यासाठी मी माझ्या कुटुंबावर आणि जवळच्या मित्रांवर अवलंबून आहे, जर या गोष्टी बरोबर असतील तर बाकी सर्व काही ठीक होईल. म्हणूनच मानसिक आरोग्य माझ्यासाठी पहिले येते. यानंतर, शारीरिक आरोग्याबद्दल सांगायचे झाल्यास मी माझ्या आहाराची योग्य काळजी घेतो. मी छान झोपतो आणि भरपूर पाणी पितो.”

यानंतर विकी म्हणाला, ‘तुम्हा सर्वांना याविषयी फारसे माहिती नसेल पण माझी पत्नी चालती फिरती डॉक्टर आहे. ती शास्त्रज्ञ आहे. तिच्याकडे खूप ज्ञान आहे आणि ते थोडे जास्तच आहे. पण ती मला खूप मदत करते. मी माझे खाणे-पिणे व्यवस्थित आणि वेळेत करतो का, मी नीट झोपतो का की फक्त कामाच्या मागे धावतो या सर्व गोष्टींकडे तिचे बारीक लक्ष असते.”

कतरीना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह ९ डिसेंबर २०२१ रोजी झाला होता. कतरीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांनी काम केले. सध्या ती ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय कतरीना फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.