विकी कौशलने या अभिनेत्रींनाही केले आहे डेट..कपू...

विकी कौशलने या अभिनेत्रींनाही केले आहे डेट..कपूर खानदानाच्या सुनेसोबतही घेतल्या होत्या प्रेमाच्या आणाभाका (Vicky Kaushal Has Had An Affair With These Beauties, Had Also Taken Vows Of Love With The Daughter-In-Law Of The Kapoor Family)

बॉलिवूडच्या हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अभिनेता विकी कौशलने मेहनतीने इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. आजच्या काळात तो त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात पूर्णपणे स्थिरावला आहे.

विकीने डिसेंबर 2021 मध्ये अभिनेत्री कतरिना कैफसोबत विवाहगाठ बांधली. पण कतरिनाच्या आधी विकीचे कितीजणीं सोबत अफेअर होते हे तुम्हाला माहित आहे का ? नसले तर चला जाणून घेऊ.

हरलीन सेठी

 उत्कृष्ठ डान्सर आणि अभिनेत्री हरलीन सेठीसोबत विकी कौशलचे अफेअर असल्याची चर्चा होती. 2019 मध्ये ‘उरी’ चित्रपटाच्या वेळीही हरलीनने सोशल मीडियावर भरपूर प्रमोशन केले होते. अनेकदा ती विकीसोबत दिसायची. पण जसजसे विकी यशाच्या शिखरावर चढू लागला, तसतसे या दोघांचे नातेही कमकुवत होत गेले. जरी दोघांनी कधीच त्यांच्या नात्याचा खुलासा केला नसला तरी ब्रेकअपनंतर हरलीनने त्यांच्या ब्रेकअपशी संबंधित एक नोट शेअर केली. या ब्रेकअपने हरलीन सेठी मनाने खूप दुखावली होती. त्यांच्या चाहत्यांनाही या बातमीमुळे खूप दु:ख झाले.

तापसी पन्नू

मिळालेल्या माहितीनुसार ‘मनमर्जियां’ चित्रपटादरम्यान विकी कौशल आणि तापसी पन्नूमध्ये खूप जवळीक निर्माण झाली होती. दोघांमध्ये ऑन-स्क्रीन जेवढी दमदार केमिस्ट्री दिसली, तेवढीच बॅक कॅमेराही होती असं म्हटलं जातं. मात्र, चित्रपटाच्या अखेरीस त्यांचे प्रेमही संपुष्टात आले.

बनिता संधू

 विकी कौशलचे आतापर्यंत जेवढे अफेअर झाले ते बहुतांशी त्याच्या चित्रपटाच्या सेटवरच झाले. आणि चित्रपटाच्या शूटिंगच्या अखेरीस ते संपायचे. असेच त्याचे अभिनेत्री बनिता संधूसोबतही अफेअर होते. बनिता संधू आणि विकी कौशलही जोडी सरदार उधम या चित्रपटात दिसली होती. त्यावेळी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या चर्चां बंद झाल्या.

आलिया भट्ट

 ‘राझी’ चित्रपटादरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट आणि  विकी कौशल यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.त्यांनी त्यांचे नाते खूपच खासगी ठेवले होते. पण त्यांच्यात काहीतरी बिनसले आणि दोघांचेही मार्ग वेगळे झाले.

श्वेता त्रिपाठी

मसान चित्रपटादरम्यान विक्की आणि श्वेतामध्येही एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवायचे. पण पुढे लवकरच ते नातेही तुटले.