विकी कौशल म्हणाला बर्गर-पिझ्झा खाऊनही वजन कमी क...

विकी कौशल म्हणाला बर्गर-पिझ्झा खाऊनही वजन कमी करता येते, अभिनेत्याचा अतरंगी डाएट प्लॅन ऐकून चकित झाले बिग बी(Vicky Kaushal Can Lose Weight By Eating Burger And Pizza, Amitabh Bachchan Was Surprised To Hear The Actor’s Strange Diet)

बॉलिवूड स्टार्स असो किंवा टीव्ही स्टार्स, त्यांच्यासाठी स्वतःला फिट ठेवणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळेच जिममध्ये घाम गाळणे, योगासने आणि ध्यान करणे याशिवाय हे लोक खाण्यापिण्याबाबतही खूप जागरूक असतात. हे सेलिब्रिटी कोणत्याही प्रकारचे जंक फूड खाणं टाळतात. पण अभिनेता विकी कौशल मात्र बिनधास्त जंक फुड खातो. याचा खुलासा खुद्द विकीने कौशलने केला आहे.

विकी कौशल टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक म्हणून गेला आहे. विकी कौशलसोबतचा एपिसोड 1 जानेवारी रोजी प्रसारित केला जाईल, परंतु त्यापूर्वी त्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये विकी कियारा अडवाणीसोबत शोमध्ये उपस्थित आहे. ‘कौन बनेगा करोडपती’  हा शोसुद्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे या शोमध्ये काही खास पाहुणे येणार आहेत, त्यापैकी एक विकी कौशल आहे. याच शोमध्ये विकीने अमिताभ बच्चन यांना आपल्या विचित्र आहाराबद्दल सांगितले, जे ऐकून बिग बी खूपच आश्चर्यचकित झाले.

फास्ट फूड खाल्ल्याने आपले वजन झपाट्याने वाढते हे सर्वांना माहीत आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आपल्याला ग्रील्ड सँडविच, ग्रील्ड चिकन इत्यादी खाण्याचा सल्ला दिला जातो. सहसा बॉलिवूड सेलिब्रिटी या पदार्थांचा आहारात समावेश करतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे विकी कौशलचा डाएट थोडा वेगळा आहे.

पिझ्झा-बर्गर खाऊनही आपण स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवू शकतो, असा खुलासा या अभिनेत्याने केबीसीमध्ये केला. असे जंक फूड खाल्ल्याने वजन वाढत नाही. पिझ्झा-बर्गर खाऊनही वाढलेले वजन कमी करू शकता. विकीचे हे बोलणे ऐकून प्रेक्षक हसायला लागले. त्यावेळी अमिताभ बच्चन त्याला वजन कसे वाढवता असे विचारतात तेव्हा विकी म्हणतो की ग्रील्ड फूड खाल्ल्याने वजन वाढते. विकीच्या या उत्तराने अमिताभ बच्चन आश्चर्यचकित झाले आहेत.

फक्त जेवणच नाही, विकीने आणखी एक मनोरंजक खुलासा केला की जिथे लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात, तिथे विकीला वजन वाढवण्यासाठी जिममध्ये जावे लागते. यावर बिग बी म्हणतात की हे पूर्णपणे उलटले आहे. यावर विकी म्हणतो की पंजाबींसाठी ही खूप चांगली समस्या आहे.