विक्की कौशल आणि कतरीना कैफ यांची लगीनघाई…, या द...

विक्की कौशल आणि कतरीना कैफ यांची लगीनघाई…, या दिवशी घेणार सात फेरे (Vicky Kaushal and Katrina Kaif’s wedding date revealed, will tie the Knot soon)

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यातील प्रेमप्रकरण बऱ्याच दिवसांपासून चर्चिले जात आहे. ही दोघं लग्न करणार असल्याच्या बातम्याही ऐकिवात आहेत. दोघांचे चाहते तर त्यांना वधू-वर बनताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉटही केले गेले आहे. मात्र दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काही सांगितलेले नाही.

दोघांनीही आपापल्या नात्याबद्दल मौन बाळगले असले तरी हे नाते लग्नाच्या बंधनात बांधण्याची सर्व तयारी सुरू केली आहे. बातम्यांनुसार, त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली असून लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबरमध्ये सात फेरे घेणार असल्याचे समजते. त्यांच्या लग्नाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे, परंतु या जोडप्याने लग्नाची तारीख गुप्तच ठेवण्याचे ठरवले आहे.

रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिना यांची लगीनघाई सुरू झाली आहे. त्यांनी त्यांच्या लग्नाचा पोशाख डिझाइन करण्याची जबाबदारी एका सेलिब्रिटी डिझायनरला दिली आहे. बातम्यांनुसार, दोघांच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केले आहेत. कतरिना कैफ तिच्या लग्नाच्या दिवशी रॉ सिल्कचा लेहेंगा घालणार आहे आणि सब्यसाचीने त्याचे डिझाइन करण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडेच कतरिना विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंह’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला गेली होती. तेथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये विकी आणि कतरिना मिठी मारताना दिसत होते. कतरिनाने या चित्रपटातील विकीच्या अभिनयाचे कौतुक केले होते, त्यानंतर त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा बरीच चर्चा झाली होती.

दोन महिन्यांपूर्वी म्हणजे ऑगस्ट मधील १८ला या दोघांनी साखरपुडा केला असल्याची बातमी समोर आली होती.

मात्र, कतरिनाच्या निकटवर्तीयांनी ही बातमी अफवा असल्याचे म्हटले होते. पण नुकतेच ‘उधम सिंह’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विकीने कतरिनासोबतच्या रोकेच्या बातमीवर मौन सोडले आणि म्हणाला, ‘योग्य वेळ आल्यावर माझी एंगेजमेंट होईल. त्याचीही वेळ येईल.’ तेव्हापासून दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत असा अंदाज लावला जात होता आणि लवकरच हा अंदाज सत्यात उतरणार आहे. तरीही दोघांपैकी कोणीही अद्याप लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.