येत्या ९ डिसेंबरला विक्की कौशल आणि कतरिना कैफ क...

येत्या ९ डिसेंबरला विक्की कौशल आणि कतरिना कैफ करणार लग्न (Vicky Kaushal And Katrina Kaif Will Get Married On December 9)

आपल्या आवडत्या कलाकारांचं लग्न म्हणजे चाहत्यांसाठी स्वतःच्या लग्नाहूनही आनंदाचा क्षण म्हणावा लागेल. आता हेच बघा, विक्की कौशल आणि कतरिना कैफ लग्न करणार आहेत हे कळल्यापासून चाहते त्यांच्या लग्नासाठी त्यांच्याहूनही अधिक उत्साही आहेत. चाहत्यांची ही आतुरता आता संपणार आहे. कारण येत्या डिसेंबरच्या ९ तारखेला विकी आणि कतरिना लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांचं लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवारा या रिसॉर्टमध्ये होणार आहे. कतरिना कैफच्या जवळच्या स्त्रोताकडून या वृत्ताला पुष्टी देण्यात आली आहे. त्या सूत्रानूसार दोघंही ९ डिसेंबरला हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. या लग्नसोहळ्याला या दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमध्ये अनुक्रमे ७ आणि ८ डिसेंबर रोजी संगीत आणि मेहंदीचे सेलिब्रेशन होणार आहे, असं समजते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

लग्नासाठी कतरिनाच्या हातावर जी खास मेंदी लावली जाणार आहे, त्या मेंदीची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे. मात्र, मेंदी बनवणारी कंपनी ही मेंदी अभिनेत्रीला भेट देणार आहे. वास्तविक, राजस्थानच्या जोधपूरच्या पाली जिल्ह्यातील सोजत मेहंदी खूप प्रसिद्ध आहे, जी कतरिनाला तिच्या खास दिवशी भेट म्हणून दिली जाईल. कतरिनासाठी बनवलेल्या या मेहंदीमध्ये कोणतेही रसायन वापरले जाणार नाही.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आता लग्नाची तारीख खूप जवळ आली आहे आणि ही बातमी पूर्णपणे खात्रीदायक असल्याचं सांगण्यात येत असतानाच, विकी कौशलची चुलत बहीण डॉ. उपासना वोहरा यांना जेव्हा विकी आणि कॅटच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आश्चर्यचकित करणारं होतं. वास्तविक, उपासनाने स्पष्टपणे सांगितलं की, ”अभिनेत्याच्या लग्नाच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. ही केवळ अफवा आहे.”

डॉक्टर उपासना म्हणाल्या की, “लग्नाच्या तयारीपासून ते तारखांपर्यंत, मीडियामध्ये ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या केवळ अफवा आहेत. त्यांचं लग्न होत नाहीये. असं काही घडलं तर ते जाहीर करतील. बॉलीवूडमध्ये अनेकदा अफवा येतात आणि नंतर कळतं की प्रकरण काही वेगळंच होतं. अलीकडेच माझं माझ्या भावाशी बोलणं झालं. तसं काही नाही. बाकी मला या विषयावर अधिक भाष्य करायचं नाही. पण सध्या लग्न होत नाहीये.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

विकीच्या बहिणीनं त्यांच्या लग्नाची ही बातमी अफवा असल्याचं म्हटलं असलं तरी जाणकारांच्या म्हणण्यानुसार लग्नाची गुप्तता राखण्यासाठी हे केलं जात असणार आहे. लग्नाशी संबंधित कोणतीही बाब येऊ देऊ नका, असं कुटुंबीयांना सांगण्यात आलं असावं. आता या दोन्ही स्टार्सच्या लग्नाच्या बातम्या खरंच खोट्या आहेत की खऱ्या हे येणारा काळच सांगेल.