विकी कतरिना यांच्यामध्ये या गोष्टीवरून होतो वाद...

विकी कतरिना यांच्यामध्ये या गोष्टीवरून होतो वाद, कॉफी विथ करणमध्ये विकीने केला खुलासा (Vicky Kaushal and Katrina Kaif fight over this reason, Vicky reveals the secret on Koffee With Karan)

करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या सोफ्यावर जेव्हा एखादा कलाकार बसतो तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील अशी गुपिते उघड करतो की लोक ते ऐकून हैराण होतात. या शोमध्ये नुकतीच अभिनेता विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्राने उपस्थिती लावली होती. तेव्हा या दोघांनी आपापल्या कामांपासून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी विकी कौशलने त्याच्या लग्नातल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला तसेच कतरिनासोबतच्या भांडणांबद्दल देखील सांगितले.

विकी आणि कतरिनाच्या नात्याची सुरुवात ‘कॉफी विथ करण’ या शोपासूनच झाली होती. विकीने स्वत: एपिसोडमध्ये कबूल केले की तो याआधी कधीच कतरिनाला भेटला नव्हता. कॉफी विथ करणच्या आधीच्या सीजनमध्ये कतरिनाने तिची जोडी विकीसोबत चांगली दिसेल असे म्हटले होते. विकीने कधी विचारही केला नव्हता की त्याचे कतरिनासोबत लग्न होईल. यावेळी जेव्हा विकी शोमध्ये आला तेव्हा त्याने सांगितले की त्या एपिसोडनंतर त्याला कळले की कतरिना कैफ देखील त्याला ओळखते. पण त्याआधी तो कतरिनाला भेटला नव्हता.

यावेळी विकीने त्याच्या आणि कतरिनाच्या लग्नातल्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्याने कतरिनाचे खूप कौतुक केले. शिवाय त्याच्यात आणि कतरिनामध्ये सुद्धा सर्वसामान्य पती-पत्नीप्रमाणेच भांडणे होतात हे देखील सांगितले. पण त्या भांडणाचे कारण अगदीच किरकोळ असते.

विकीने सांगितले की, आम्ही दोघं कपाटाच्या जागेवरून भांडतो. लग्न झाल्यापासून माझ्या कपाटातली जागा कमी होत आहे. कतरिनाने स्वत:च्या कपड्यांसाठी दीड खोली घेतली आहे. आणि मी केवळ एका कपटापुरताच मर्यादित आहे. कदाचित लवकरच त्या कपाटाचे रुपांतर वॉर्डरोबमध्येही होऊ शकतं. या मुद्द्यावरून आमचे अनेकदा भांडण होत असते.” विकीच्या या स्पष्टीकरणाला करणने देखील दुजोरा देत म्हटले की, मी जेव्हा विकी आणि कतरिनाच्या घरी गेलो होतो तेव्हा मी पाहिले की विकीच्या कपाटाची जागा खूपच कमी होती.

विकी कौशलने त्याच्या वैवाहिक जीवनाविषयी बरेच काही सांगितले. तो म्हणाला की, त्याचे आणि कतरिनाचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत आहे. जेव्हा करणने विकीला विचारले की कतरिनाशी लग्न करताना कसे वाटले, तेव्हा विकीने अप्रतिम उत्तर दिले. तो म्हणाला, मला आता आयुष्यात स्थिरावल्यासारखे वाटते. कतरिना खूप चांगली व्यक्ती आहे, ती खूप हुशारही आहे. तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळते. मी खूप भाग्यवान आहे म्हणून मला कतरिनासारखी जीवनसाथी मिळाली.

विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबर 2021 मध्ये विवाह बंधनात अडकले. दोघांची प्रेम कहाणी सुरु होण्यापाठी करण जोहरच्या शो चा खूप मोठा वाटा आहे. याच शोमध्ये करणने विकीला, कतरिना त्याच्याबद्दल काय विचार करते ते सांगितले होते. त्या घटऩेनंतरच दोघांमधील संवादाला सुरुवात झाली होती. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी लग्न केले. त्यांचे चाहते त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.