विकीने अंकिताला लग्नाची भेट म्हणून दिला ५० कोटी...

विकीने अंकिताला लग्नाची भेट म्हणून दिला ५० कोटींचा व्हिला (Vicky Jain Gifts Ankita Private Villa In Maldives Worth 50 Crore)

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) १४ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर त्यांनी मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते, ज्यात चित्रसृष्टीमधील अनेक सेलिब्रिटी, स्टार्स आणि कुटुंबियांनी हजेरी लावली. या रिसेप्शनमध्ये दोघांनाही अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून मिळाल्या आहेत.

Vicky Jain, Gifts, Ankita, Private Villa In Maldives, विकी, अंकिता, लग्नाची भेट, ५० कोटींचा व्हिला

विकीने अंकिताला लग्नात भेट म्हणून मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. या व्हिलाची किंमत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर अंकिताने देखील विकीसाठी एक प्रायव्हेट यॉट भेट म्हणून दिली आहे. या यॉटची किंमतही ८ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ही यॉट विकीला प्रचंड आवडली असल्याचे म्हटले जात आहे.

Vicky Jain, Gifts, Ankita, Private Villa In Maldives, विकी, अंकिता, लग्नाची भेट, ५० कोटींचा व्हिला

या व्यतिरिक्त टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी आणि स्टार्सने देखील अंकिताला भारी भेटवस्तू दिल्या आहेत.

एकता कपूरने अंकिताला एक हिऱ्यांचा सेट भेट दिला आहे, ज्याची किंमत ५० लाख सांगितली जातेय तर माही विजने अंकिताला सब्यसा कलेक्शनची १५ लाखाची साडी दिली आहे. अभिनेत्री सृष्टी रोडेने अंकिताला ५ लाखांची सोन्याची चेन गिफ्ट केली आहे. अंकिताची मैत्रिण रश्मी देसाई बिग बॉसमुळे लग्नात येऊ शकली नाही, पण तिने आपल्या मैत्रिणीसाठी भेट म्हणून नीता लूला यांची १० लाखाची साडी पाठवली आहे.

Vicky Jain, Gifts, Ankita, Private Villa In Maldives, विकी, अंकिता, लग्नाची भेट, ५० कोटींचा व्हिला

ऋत्विक धनजानीने विकी जैन आणि अंकिता दोघांना गिफ्ट दिले आहे. ऋत्विकने विकीला एक लग्झरी घड्याळ आणि अंकिताला गळ्याबरोबरचा हिऱ्याचा हार दिला आहे. टायगर श्रॉफने अंकिता लोखंडेला ‘मिनी कूपर’ ब्रँडची कार दिली आहे. तर शाहीर शेखने तिला २५ लाखाची गोल्ड ज्वेलरी भेट केली आहे.

Vicky Jain, Gifts, Ankita, Private Villa In Maldives, विकी, अंकिता, लग्नाची भेट, ५० कोटींचा व्हिला

अंकिता आणि विकी २०१८ पासून एकमेकांना ओळखत होते आणि डेट करत होते. आता फायनली १४ डिसेंबरला त्यांनी मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये लग्न केले आहे. दोघांचा मेंदी, साखरपुडा, हळद, संगीत असा संपूर्ण लग्नसोहळा अगदी राजेशाही थाटात पार पडला असून या लग्नसोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम