प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे दु...

प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे दुःखद निधन (Veteran producer Nitin Manmohan passes away at a hospital in Mumbai)

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते नितीन मनमोहन यांचे आज २९ डिसेंबर रोजी निधन झाले आहे.

३ डिसेंबर रोजी नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या तब्येतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

नितीन मनमोहन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘बोल राधा बोल’, ‘लाडला’, ‘दस’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे निर्माते मनमोहनने सलमान खानचा ‘रेडी’ चित्रपटही तयार केला. विशेष म्हणजे नितीन हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनमोहन यांचा मुलगा आहे. अभिनेता मनमोहन हे ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. वडिलांप्रमाणेच नितीनही चित्रपटसृष्टीशी संबंधित होते.