दिलीपकुमार पुन्हा हॉस्पिटलात (Veteran Actor Dil...

दिलीपकुमार पुन्हा हॉस्पिटलात (Veteran Actor Dilip Kumar Admitted To Hinduja Hospital Due To Breathlessness)

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना या महिन्याच्या सुरुवातीलाच तब्येत बिघडली म्हणून हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. पण त्यांना पुन्हा श्वासोच्छवास करण्यास त्रास जाणवू लागल्याने मुंबईच्या खार येथील हिंदुजा हॉस्पिटलात भर्ती करण्यात आले आहे.

दिलीपकुमार आता आयसीयू मध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला हॉस्पिटलातून मिळालेल्या बातमीनुसार दिलीपसाहेबांची तब्येत स्थिर आहे. मागच्या खेपेला त्यांच्या प्रकृतीत जो बिघाड झाला होता, तोच याही खेपेस निदर्शनास आल्याने, त्यांच्या वृद्धापकाळाचा विचार करता, त्यांच्या फॅमिलीने हॉस्पिटलात भर्ती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर्स त्यांच्यावर बारीक नजर ठेवून आहेत.

याच महिन्यात प्रकृतीच्या तक्रारीवरून दिलीपकुमार यांना ६ जून रोजी याच हिंदुजा हॉस्पिटलात आणले गेले होते. उपचार करून सुधारणा झाली तेव्हा ११ जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.