विकी कौशलच्या मिठीत शिरली ‘पंजाबची कतरीना...

विकी कौशलच्या मिठीत शिरली ‘पंजाबची कतरीना कैफ’ शहनाज गिल, दोघांचा रोमॅण्टिक अंदाज पाहून चाहते झाले खुश, (‘Very Seldom You Meet A Star Who Makes You Feel You Are One Of Them…’ Says Shehnaaz Gill As She Strikes A Romantic Pose With Vicky Kaushal, See Pictures)

शहनाज गिलच्या क्यूटनेसचे सर्वांनाच वेड लागले आहे. तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात. अलीकडेच शेहनाज पंजाबी मुंडा विकी कौशलसोबत दिसली होती. शहनाजने आपला नवीन चॅट शो –  देसी वाइब्स विद शहनाज गिल लॉन्च केला आहे, याआधी या शोमध्ये आयुष्मान खुराना, राजकुमार राव यांसारखे अभिनेते सहभागी झाले होते. आणि आता आपला आगामी चित्रपट गोविंदा नाम मेराच्या प्रमोशनसाठी विकी कौशल या चॅट शोमध्ये गेला होता .

शहनाजने आपल्या इन्स्टाग्रामवर विकीसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. दोघांनी शोमध्ये खूप मजा केलेली त्या फोटोवरुन दिसते. फोटोत दोघांची अप्रतिम केमिस्ट्री दिसत आहे. शेहनाजही विकीला भेटून खूप उत्साहित आणि आनंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

फोटोत विकीने शहनाजला मिठी मारली आहे. तसेच त्या दोघांनी सारख्या रंगाचे कपडे घातल्यामुळे ते फारच सुंदर दिसत आहेत. शहनाजने मस्टर्ड कलरचा सूट घातला आहे आणि विकीने त्याच रंगाची पँट घातली आहे. दोघांची बाँडिंग आणि केमिस्ट्री पाहून चाहते प्रभावित झाले आहेत. दोघांनीही एकत्र रोमँटिक चित्रपट करावा, अशी प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहे.

चाहते तिला पंजाबची कतरीना असे म्हणतात. पण यावेळी चाहत्यांनी तिला फक्त पंजाबचीच नाही तर भारताची शहनाज गिल असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी आणि अनेक परदेशी चाहत्यांनी त्यावर शहनाज गिल केवळ भारताचीच नाही तर जगाची आहे… आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो असे म्हटले.

या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये शहनाजने लिहिले आहे- तुम्ही अशा स्टारला भेटणे फार कमी वेळा घडते ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्यापैकी एक आहात. फार क्वचितच, तुमच्या दुसऱ्या भेटीत तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत आहात जणू ते तुमचे कुटुंब आहे.

माझ्या मते हा खरा स्टार आहे. विकी कौशल तुम्हाला पुन्हा एकदा भेटून खूप आनंद झाला आणि आजचा संवाद केवळ संवादापेक्षा जास्त होता… मी तुम्हाला यश, चांगले आरोग्य आणि सकारात्मकता मिळो अशा शुभेच्छा देते. गोविंदा नाम मेरा चित्रपट सुपरहिट होवो. हार्दिक शुभेच्छा!

शेहनाजबद्दल बोलायचे झाले तर ती स्वतः लवकरच सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.