नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतील तर वास्तूमध्ये...

नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतील तर वास्तूमध्ये करा हे उपाय (Vastu Tips For Married Couple)

नवरा-बायकोमध्ये सतत भांडणं होत असतील आणि ती संपतच नसतील, तर आपण आपल्या वास्तूमध्ये काही दोष तर नाही ना? हे पडताळून पाहिलं पाहिजे. घरात वास्तुदोष असल्यास नवरा-बायकोमध्ये भांडणं होऊ शकतात. नवरा-बायकोचं एकमेकांशी न पटणं, कोणत्याही विषयावर एकमत न होणं, सतत कुरबुरी चालू असणं अशी परिस्थिती निर्माण झाल्यास घरातील वास्तूकडे लक्ष दिलं पाहिजे. वास्तुदोषामुळे जर नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतील तर ती होऊ नयेत म्हणून कोणते उपाय करावेत, हे सांगताहेत वास्तुतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर प्रेम पंजवानी –

वास्तुतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर प्रेम पंजवानी असं म्हणतात की, दिशांचा आपल्या वैवाहिक जीवनावर खोलवर परिणाम दिसून येत असतो. घरामध्ये नवरा-बायको यांचा फोटो चुकीच्या दिशेला ठेवला आहे, बेडरूममध्ये चुकीच्या ठिकाणी आरसा आहे, लग्नाच्या फोटोचा अल्बम चुकीच्या दिशेला ठेवला आहे, नवरा-बायकोच्या बेडची दिशा चुकीची आहे अशा छोट्या छोट्या गोष्टीही नवरा-बायकोंमधील भांडणास कारण ठरू शकतात. काही वेळा एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे नवरा-बायकोही अचानक भांडणं करू लागतात. त्यांना एकमेकांचे विचार पटेनासे होतात. तुमच्यासोबतही असा काही प्रसंग ओढवला असेल तर खाली दिलेल्या टीप्स जरूर अजमावा, त्यामुळे नवरा-बायकोमंधील प्रेम पूर्ववत होईल.

नवरा-बायकोमधील प्रेम वाढविण्यासाठी या ५ वास्तू टिप्स

१.   नव दाम्पत्याची बेडरूम जर उत्तरेस असेल तर ते शुभ असते. यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढते आणि अपत्याचे सुख प्राप्त होते.

२.   वास्तुशास्त्रास अनुसरून दक्षिण- पश्चिम दिशेस असणारा बेडरूम शुभ फळ देणारा असतो.

३.   बेडरूमकरिता गुलाबी रंगाची निवड करा. गुलाबी रंगामुळे जोडप्यामधील प्रेम वाढते.

४.   बेडरूममध्ये गुलाबी किंवा लव्हेंडर रंगाचे पडदे किंवा बल्ब लावा.

५.   नवरा-बायकोमधील प्रेम वृद्धिंगत व्हावे याकरिता घराच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये काच किंवा सिरॅमिक पॉटमध्ये लहान लहान दगड किंवा क्रिस्टल घालून लाल रंगाच्या दोन मेणबत्त्या पेटवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरेल.