प्रेयसीसोबत मुंबईत या ठिकाणी फिरायचा वरुण धवन (...

प्रेयसीसोबत मुंबईत या ठिकाणी फिरायचा वरुण धवन (Varun Dhawan Used To Roam In This Area Of Mumbai With Girlfriend, Used To Live A Simple Life)

वरुण धवन केवळ करीअरमध्येच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही सेटल झाला आहे. वरुण हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा असल्यामुळे करीअरच्या आधीपासूनच तो ऐषोआरामाचे जीवन जगत असेल, महागड्या गाड्यांनी फिरत असेल असे विचार अनेकांच्या मनात नेहमीच येत असतील. तुम्ही ही असाच विचार करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. कारण चित्रपटात येण्यापूर्वी वरुण स्टार किड प्रमाणे नाही तर सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगायचा.

 वरुण धवनचा ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरुणचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत. त्यामुळे या चित्रपटासाठी वरुणने खूप मेहनत घेतली होती. त्यांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. या चित्रपटाच्या टीमने अनेक मोठ्या कार्यक्रमांसोबतच मेट्रोमध्ये सुद्धा चित्रपटाचे प्रमोशन केले होते. हा सर्व खटाटोप वेळ वाचवण्यासाठी केला आणि चित्रपटांत येण्यापूर्वी तो सार्वजनिक वाहनांनीच प्रवास करायचा असे वरुणने सांगितले.

वरुण पुढे म्हणाला की ‘मी नेहमी गाड्यांमधून फिरतो असा लोकांचा माझ्याबद्दल गैरसमज आहे. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा मी सांताक्रूझवरुन ट्रेन पकडून चर्चगेटला जायचो. पप्पांनी आम्हाला कधीच गाडी दिली नाही. त्यामुळे मला लोकल ट्रेनचा खूप चांगला अनुभव आहे. तेव्हा मी ट्रेनमधले धक्के सुद्धा सहन केले आहेत. पण मित्रांसोबतचा तो प्रवास खूप चांगला वाटायचा. ‘

 वरुणने त्याला सार्वजनिक वाहनांमध्ये रिक्षा खूप आवडते असे सांगितले. सोबतच तो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन रिक्षामधून खूप फिरायचा. मुंबईच्या ट्रॅफिकमुळे तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत अशा गल्लीबोळ्यातून फिरला आहे की जिथे गाड्या जाऊच शकत नाही असे देखील त्याने सांगितले. मित्रांसोबत मजामस्ती करत रिक्षामधून फिरायला खूप मजा यायची अशी आठवण वरुणने सांगितली.

वरुणने  2010 मध्ये करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. पुढे त्याने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वरुणने मागे वळून पाहिले नाही. त्याने आपल्या करीअरमध्ये आतापर्यंत जवळपास 30 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, वरुण धवनने जानेवारी 2020 मध्ये त्याची दीर्घकाळाची मैत्रीण नताशाशी लग्न केले. सध्या ते दोघेही मुंबईतील जुहू भागात एका भव्य अपार्टमेंटमध्ये राहतात.