वरुण धवन ३४ वर्षांचा झाला (Varun Dhawan turned ...

वरुण धवन ३४ वर्षांचा झाला (Varun Dhawan turned 34; Fans wishes on His Birthday)

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडमधील उमदा अभिनेता वरुण धवन आज ३४ वर्षांचा झाला आहे.  वरुण धवनने त्याच्या चार्मिंग लूकबरोबरच सकस अभिनयाने आजवर अनेक तरुणींची मनं जिकली आहेत. आपल्या कॉमेडीने तरुणांच्या गळ्यातला ताईत झालेला वरुण सध्या त्याच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी मित्र त्याला जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत आहेत. वरुण धवनच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्यासंबंधी काही विशेष बाबी…

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

वरुण धवन, सुप्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांचा लहान मुलगा असला तरी त्याने करण जौहर याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वरुण धवनने करण जौहरला त्याच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटासाठी असिस्टही केलं आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकलेल्या वरुणला खरं तर कुस्तीपट्टू बनायचं होतं. आणि त्यासाठी त्याने रितसर प्रशिक्षणही घेतलं होतं. मुंबईमध्ये आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी वरुण परदेशात गेला.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अभिनेता असूनही वरुण धवनला समाजसेवेमध्ये अतिशय रुची आहे. महिला दिन असो वा मुली वाचवा यासारखी मोहीम अशा अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये तो आपला पाठिंबा देतो. आपलं मत व्यक्त करताना दिसतो.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

२०१५ मध्ये वरुण धवनला ‘बदलापुर’ मधील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

या वर्षीच्या २४ जानेवारीला वरुण धवनने आपली मैत्रीण नताशा दलाल सोबत लग्न केलं. वरुण धवन आणि नताशा कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना डेट करत होते. करोना महामारीमुळे काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न झालं.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

वरुण धवन सध्या त्याच्या ‘भेडिया’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता परंतु, करोना लॉकडाऊनमुळे सध्या शूटिंग बंद ठेवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ‘जुग जुग जियो’ या चित्रपटामध्ये वरुण, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी सोबत दिसेल. ‘इक्कीस’ आणि ‘रणभूमि’ हे देखील वरुणचे आगामी चित्रपट आहेत. अजूनही अनेक चित्रपट आहेत परंतु सध्या सगळ्यांचेच शूटिंग करोनामुळे बंद ठेवण्यात आलं आहे. वरुणचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी खूपच खास आहे आणि म्हणूनच सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘माझी सहेली’ कडूनही वरुण धवनला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!