सानिया मिर्झा होती वरुण धवनची क्रश, अभिनेत्याने...

सानिया मिर्झा होती वरुण धवनची क्रश, अभिनेत्याने सांगितला पहिल्या मुलाखतीतला रंजक किस्सा (Varun Dhawan Once Had A Crush On Sania Mirza, The Actor Told An Interesting Story Of Their First Meeting)

आजच्या काळातील सर्वात हुशार आणि देखण्या अभिनेत्यांच्या यादीत वरुण धवनचा समावेश होतो. तो आपल्या विनोदी आणि मजेदार-प्रेमळ स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. वरुण सध्या आपल्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत टेनिस स्टार सानिया मिर्झावर आपला एकेकाळी प्रचंड क्रश होता असे वरुणने सांगितले.
मुलाखतीदरम्यान वरुण धवनने सांगितले की, माझा टेनिस स्टार सानिया मिर्झावर खूप क्रश होता. पण त्यावरुन सानियाची आई मला ओरडली होती.तेव्हा मी एका प्रोडक्शन कंपनीत जाहिरातीसाठी काम करत होता.


याबद्दल बोलताना वरुण म्हणाला, “मी मॅड प्रॉडक्शनच्या मुकुल आनंदच्या टीमसाठी एका जाहिरातीसाठी काम करत होतो, त्यात सानिया मिर्झा देखील होती. आम्हाला 300 शूज घ्यायचे होते. त्यासाठी मी लिंकिंग रोडला गेलो आणि 300 शूज भाड्याने घेतले. त्यावेळी सानियाच्या आईने मला सफरचंद आणायला सांगितले आणि मी सफरचंद आणले. मी सफरचंद घेऊन तिच्या आईकडे गेलो. त्यांना ते सफरचंद देताना मी थरथरत म्हणालो, आंटी, सफरचंद. तिच्या आईला ते थोडं विचित्र वाटलं म्हणून त्यांनी मला हे सफरचंद तुला आणायला कोणी सांगितलं? असं विचारलं.

सुदैवाने सानिया तिथे आली आणि तिने सर्व परिस्थिती सावरली. त्यासाठी मला 5000 रुपये मिळाले. कदाचित ते शूज आणि एक सफरचंद देण्यासाठी मिळालेले असावेत.”
वरुण धवन सध्या आपल्या ‘भेडिया’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी यांसारखे दिग्गज कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.