या आजाराशी झुंज देत आहे वरुण धवन, म्हणतो –...

या आजाराशी झुंज देत आहे वरुण धवन, म्हणतो – संतूलन बिघडले आहे… (Varun Dhawan Is Battling This Disease, Said – Balance Has Deteriorated)

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या ‘भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अर्थात चित्रपटात वरुण मध्यवर्ती भूमिकेत दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे. सध्या तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो लोकांच्या पसंतीस आलेला आहे. आता याच दरम्यान वरुण धवनने त्याच्या आयुष्याशी निगडीत एक रहस्य उघड केले आहे. अभिनेत्याने सांगितले की, तो एका आजाराशी झुंज देत आहे, ज्यामुळे त्याचे संतुलन बिघडले आहे. वरुण धवन असा कोणत्या आजाराशी झुंज देत आहे ते आपण जाणून घेऊया.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

एका मुलाखती दरम्यान वरुण धवनने, कोरोनानंतर गोष्टी खूप बदलल्या असून या साथीच्या रोगाने प्रत्येकाला मानसिक त्रास दिला आहे, असे सांगितले. इंडिया टुडे कॉन्कलेवमध्ये बोलत असताना वरुण म्हणाला, “कोरोनानंतर जेव्हा जनजीवन पूर्वपदावर आले त्यावेळेस आपण पुन्हा जेथे आधी होतो त्याच शर्यतीत असल्यासारखे तुम्हाला वाटत नाही का? इथे किती लोक आपण बदलले आहोत असे म्हणू शकतात? मी पाहिले आहे की, लोकं पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करत आहे. खरं तर मी माझ्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटासाठी इतकी मेहनत घेतली आहे की मी निवडणुकीसाठी धावत आहे असे वाटले. का माहीत नाही पण मी स्वतः खूप दबावाखाली असल्याचा अनुभव घेतला आहे.”

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

वरुण पुढे म्हणाला, “मला काय झाले आहे ते मला माहीत नाही. मला वेस्टिबुलर हायपोफंक्शनचा त्रास होत आहे, ज्यामध्ये तुमचा तोल बिघडतो. मी स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आपण फक्त या शर्यतीत धावत आहोत. का ते कोणीच विचारत नाही. मला वाटते की आपण सर्व एका मोठ्या उद्देशासाठी येथे आहोत. मी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि आशा आहे की लोकांनाही त्यांचा उद्देश सापडेल.”

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय? वास्तविक, वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक प्रकारचा विकार आहे. या विकारामुळे कानाच्या आतील संतुलन बिघडते आणि त्यामुळे ती व्यक्ती नीट काम करू शकत नाही. ही वेस्टिब्युलर प्रणाली कानाच्या आत असते आणि समतोल राखण्यासाठी डोळे आणि स्नायू यांच्या संयोगाने कार्य करते. पण जेव्हा ही यंत्रणा नीट काम करू शकत नाही, तेव्हा चुकीचा संदेश मेंदूला जाऊ लागतो आणि पीडित व्यक्तीला अस्वस्थता किंवा चक्कर येऊ लागते.