वरुण धवनला टॅटूचे वावडे का ? जाणून घ्या कारण (V...

वरुण धवनला टॅटूचे वावडे का ? जाणून घ्या कारण (Varun Dhawan Doesn’t Have Tattoos On His Body Because Of This, You Will Be Surprised To Know The Reason)

बॉलिवूडमधील अनेक कलाकार टॅटू प्रेमी आहेत. काहीजण त्यांच्या शरीरावर कुटुंबाचे नाव कोरतात तर काहीजण त्यांच्या आवडीचे खास चित्र गोंदवून घेतात. काहीजण तर सध्या टॅटूचा ट्रेंड चालू आहे म्हणून सुद्धा गोंदवून घेत आहेत. पण या सगळ्यात एक असा अभिनेता आहे ज्याच्या शरीरावर एकही टॅटू नाही. तो अभिनेता म्हणजे वरुण धवन. त्याच्या शरीरावर टॅटू नसण्याचे कारण ऐकून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल.

अभिनेता वरुण धवन कामासोबतच त्याच्या फिटनेस आणि स्टाइलिश लूकसाठी सुद्धा ओळखला जातो. शरीरावर टॅटू गोंदवणे ही सर्वसाधारण गोष्ट असली तरी वरुणला मात्र टॅटू फोबिया आहे. म्हणजेच त्याला टॅटू काढायला खूप भीती वाटते. त्यामुळेच त्याला टॅटू काढण्याची जराही आवड नसल्याचे त्याने सांगितले.

वरुण धवनने त्याची बालपणीची मैत्रीण नताशा दलाल सोबत 21 जानेवारी 2021 ला लग्न केले. नताशा एक फॅशन डीझाइनर आहे. ते दोघे लहानपणापासूनच एकमेकांचे चांगले मित्र होते. कोरोनामुळे वरुण आणि नताशाचे लग्न मोजक्या माणसांमध्ये अलिबागला झाले होते.

सध्या वरुण बॉलिवूडमध्ये सुपरस्टार झाला असला तरी तो लहान असताना त्याला रेसलिंग खूप आवडायची. त्याला रेसलर बनायचे होते. पण मोठे झाल्यावर त्याने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. त्याच्या नशीबाने त्याला साथ दिली आणि आज तो सलग हिट चित्रपट देत आहे.

वरुणने त्याच्या अभिनयातील करियरची सुरुवात ‘स्टूडंट ऑफ द ईयर’या चित्रपटातून जरी केली असली तरी त्याने त्याआधी माय नेम इज खान या  चित्रपटात करण जोहरसोबत असिस्टंट म्हणून काम केले होते. त्यावेळी त्याने अभिनयातील बारकावे शिकून घेतले. वरुणचे वडील डेव्हिड धवन हे देखील एक दिग्दर्शक आहेत. वरुणने त्याच्या वडीलांच्या चित्रपटात सुद्धा काम केले आहे.