फोटोशूट दरम्यान वरुणने अचानक कियाराचे घेतले चुं...

फोटोशूट दरम्यान वरुणने अचानक कियाराचे घेतले चुंबन, व्हिडिओ व्हायरल (Varun Dhavan Took An Unexpected Kiss Of Kiara Advani In Photoshoot )

काही महिन्यांपूर्वीच कियारा अडवाणी आणि वरुण धवनचा जुग जुग जियो हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात वरुण आणि कियारासोबत मनीष पॉल, प्राजक्ता कोहली, अनिल कपूर आणि नीतू कपूर सुद्धा होते. कलाकारांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या इव्हेंट , कार्यक्रमांना उपस्थिती लावली. स्टाइलिश कपड्यांमध्ये फोटोशूट केले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. फोटोत कियारा आणि वरुणची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. पण लोकांचे लक्ष वरुणने कियाराचे कपडे ज्याप्रकारे पकडले होते तिथे गेले.

फोटोत कियारा आणि वरुणने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. पोज देताना त्याने कियाराचे कपडे नको त्या ठिकाणी पकडून ठेवले होते. या फोटोंना युजर्सकडून खूप लाइक्स मिळाल्या.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण आणि कियाराने अनेक फोटोशूट केले आहेत. अलीकडेच दोघांनी कॉस्मापॉलिटन या प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूटही केले होते. त्यांच्या फोटोशूटचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत  कियारा कॅमेऱ्याकडे पाहत असताना वरुण अचानक तिचे चुंबन घेतो, ज्यावर कियारा आश्चर्यचकित होते आणि हसून त्याला  दूर करते.

या फोटोशूटदरम्यान कियाराने चमकदार ड्रेस घातला होता आणि त्यावर तिने ग्लॉसी मेकअप केला होता. केस मोकळे ठेवले होते, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे वरुणही पांढऱ्या शर्टमध्ये खूपच छान दिसत होता. दोघांची ग्लॅमरस स्टाइल चाहत्यांना खूप आवडली.