मेकअप करा खास, दिसा सुंदर हमखास (Valentine Day ...

मेकअप करा खास, दिसा सुंदर हमखास (Valentine Day Make UP Tips)

व्हॅलेंटाइन डे हा प्रेमाचा दिवस असल्याने प्रत्येक तरुण-तरुणीसाठी या दिवसाचं महत्त्व इतरांच्या तुलनेत जरा जास्तच असतं. प्रेमामध्ये असणार्‍या तरुणींना आपण सजावं, सुंदर दिसावं आणि आनंदी राहावं असं वाटतं. घरीच व्हॅलेंटाइन साजरा करायचा असो वा आपल्या जोडीदारासोबत बाहेर जायचे असो, मेकअप हवाच. आपण इतरांपेक्षा अलग आणि आकर्षक दिसावं यासाठी मेकअप हाच योग्य पर्याय असतो. कारण मेकअप केल्यानंतर हमखास आपला लूक नवा दिसणार असतो.

स्ट्रोब किंवा ल्यूमिनियस क्रीम
-• सर्वात आधी चेहर्‍यास क्लिंझिंग आणि टोनिंग करा. आपल्या त्वचेनुसार मॉइश्चरायजरची निवड करा.
-• त्वचेचा रंग साफ असेल तर पिंक ग्लो योग्य वाटेल. रंग हलका दबलेला असेल तर गोल्डन ग्लोचा वापर करा.
-• तुम्हाला योग्य फाऊंडेशन निवडता वा वापरता येत नसेल तर स्ट्रोब किंवा ल्यूमिनियस क्रीम त्यात मिसळा. या क्रीमला तुम्ही ऑल इन वन क्रीमही म्हणू शकता. वाटल्यास बीबी किंवा सीसी क्रीम देखील यात मिसळू शकता. हे अतिशय कमी प्रमाणात लावायचे असते.
-• आजकाल मोठमोठ्या कंपन्या कंफर्टेबल आणि क्वीक मेकअपसाठी स्ट्रोब क्रीम बनवतात. यात थोडेसे शिमर, फाऊंडेशन आणि मॉइश्चरायजर एकत्र केलेले असते.
-• डोळ्यांना जास्त काळं करू नये. ते जसे आहेत तसेच ठेवावे.
-• लिपस्टिक लावल्या नंतर खालचे ओठ जर पातळ असतील, तर आतल्या बाजूस हायलायटरचा वापर करू शकता. तसेच वरच्या ओठासही हलकासा हायलायटर लावू शकता.

कॉन्टूअरिंग मेकअप
सध्या कॉन्टूअरिंग मेकअप परफेक्ट मेकअपचा खास हिस्सा बनला आहे. चेहर्‍यावरील त्रुटी लपविण्यासाठी खरंतर याचा वापर केला जातो. कॉन्टूअरिंगमुळे चेहर्‍याचे प्रत्येक फिचर्स आकर्षक आणि उठून दिसतात.
आता गोर्‍या रंगाचा जमाना नाही तर नाकीडोळी नीटस असण्याला महत्त्व आहे. पाहणार्‍याला आपण मेकअप केला आहे, हे लक्षात येऊ नये अशा पद्धतीचा नैसर्गिक मेकअप करण्याकडे कल वाढत आहे. यापुढेही बर्‍याच कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचाच मेकअप केला जाईल.
आय अ‍ॅण्ड लिप प्रायमर

सामान्यपणे चेहर्‍यासाठी प्रायमर वापरला जातो. परंतु डोळे आणि ओठांसाठीही आता खास प्रायमर मिळतो. ज्यामुळे डोळ्यांचा आणि ओठांचा मेकअप दीर्घकाळ सेट राहतो.
डोळे आणि ओठांसाठी वेगवेगळे प्रायमर बाजारात उपलब्ध आहेत. चेहर्‍यावर लावल्या जाणार्‍या प्रायमरप्रमाणेच ओठ आणि डोळ्यांच्या प्रायमरमुळे आपल्याला चांगले परिणाम मिळतात. चेहर्‍यासाठीचा प्रायमर हा जास्त हार्ड असल्यामुळे तो ओठ आणि डोळ्यांसाठी न वापरता त्यासाठी वेगळे प्रायमर बनवण्यात आले आहेत.

आय अ‍ॅण्ड लिप लायनर
बर्‍याचदा तरुणी लिप लायनरचे महत्त्व कमी लेखतात. किंबहुना ओठांवर लिपस्टीक बराच काळ टिकून ठेवण्यासाठी लिप लायनर लावणे आवश्यक आहे.
लिप लायनरने काढलेल्या आउटलाइनमुळे लिपस्टिक इकडेतिकडे पसरत नाही, कारण लिप लायनरचं टेक्सचर हे ड्राय असतं, जे क्रीमी लिपस्टिकला बांधून ठेवतं.
आय मेकअप
-• आय शॅडोची ब्लेंडिंग चांगली झाली की डोळे सुंदर दिसतात. एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेड्सचे मिश्रण केलेल्या आय शॅडो वापरण्याची सध्या फॅशन आहे. विशेषतः पिंक, ब्राऊन, चॉकलेटी रंगाच्या आय शॅडोचा वापर करा. तसेच नो लायनर वा स्मज लाइनची चलती आहे. याशिवाय ब्लॅक आय शॅडो किंवा काजळ लावून त्यास पूर्णपणे स्मज करणे योग्य ठरेल. सध्या स्मोकी आणि न्यूड लूक पसंत केला जातोय.
-• डोळ्यांचा मेकअप करताना लाल, गुलाबी यांसारखे शेड्स आता कोणी लावत नाहीत. तर दोन शेड्स एकत्र करून न्युट्रल शेड्स वापरल्या जात आहेत. जसे – पापणीवर गुलाबी आयशॅडो लावा, नंतर त्यास चॉकलेटी आय शॅडोसोबत कडेला लावून ब्लेंड करा. दोन रंगाचे आयशॅडो छान ब्लेंड झाल्यानंतर डोळ्यांचा मेकअप अधिक सुंदर दिसतो.
-• स्वतःला खोट्या पापण्या (आयलॅशेज्) लावायला जमत नसतील तर त्या लावण्याची चूक करू नका. फक्त व्हॉल्यूम मस्काराचे 1-2 कोट लावा.

हायलायटर आणि इल्यूमिनेटर
-• हायलायटर आणि इल्यूमिनेटर हे भलेही चेहर्‍यास चमकदार बनवण्यासाठी तसेच चेहर्‍याचे फीचर्स उठावदार दिसण्यासाठी मदत करतात, तरीही हे दोन्ही एकमेकांपेक्षा अगदी वेगळे दिसतात.
-• हायलायटर चेहर्‍याच्या काही भागांस आकर्षक बनवण्यास मदत करतात. हे आयब्रोची हाडं, नाकाचे मधले हाड आणि त्याच्या बरोबर खाली ओठांच्या मधोमध लावलं जातं. मात्र इल्यूमिनेटरने संपूर्ण चेहर्‍यास उठावदार करता येतं.
-• हायलायटरची शेड ही इल्यूमिनेटरच्या तुलनेत हलकी असते. त्यास फाऊंडेशनसोबत मिक्स करूनही लावता येतं आणि वेगळंही लावता येतं.
एका प्लेटमध्ये आपल्या त्वचेशी सुसंगत फाऊंडेशन ठेवा आणि त्यात 2-3 चिमटी हायलायटर घालून चांगलं एकत्र करा. हायलायटर दोन तर्‍हेचे असतात, पावडर आणि लिक्विड. आपल्या त्वचेप्रमाणे यांचा वापर करा.
लिप शेड्स

-• सध्या न्यूड शेड्स बहुत करून पसंत केल्या जातात. न्यूडमध्येही आपल्याला अनेक प्रकारच्या शेड्स मिळतात. लाल रंगाच्या लिप कलरसाठी लाल आऊटलाइनच केली पाहिजे, असे नाही. न्यूड रंगाची आऊटलाइन लावली तरी चालते.
-• लिपस्टिकचा रंग तुमच्या आउटफिटच्या रंगाशी मिळताजुळताच असावा हे जरूरी नाही. जर ब्राइट कलरची लिपस्टिक लावणार आहात तर चेहर्‍याचा बाकी मेकअप न्यूट्रल ठेवा.