‘ग्रे’ मध्ये वैभव तत्ववादीची धडाकेबाज भूमिका (V...

‘ग्रे’ मध्ये वैभव तत्ववादीची धडाकेबाज भूमिका (Vaibhav Tatvavadi Plays Dashing Character In GREY)

रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चॉकलेटबॉय फेम अभिनेता वैभव तत्ववादी ग्रे या चित्रपटामध्ये धडाकेबाज भूमिकेत दिसणार आहे.

Vaibhav Tatvavadi, GREY

आतापर्यंत वैभवने मराठी- हिंदी अशा विविध चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. वैभवने रोमँटिक भूमिकेतून तरुणींना वेड लावलं आहे, तसंच बाजीराव मस्तानी सारख्या बॉलिवूड चित्रपटात चिमाजी आप्पांच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेतही तो चमकला आहे. मात्र ग्रे या चित्रपटात वैभव कोणतीही रोमँटिक भूमिका करणार नसून वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. यात वैभव सिद्धांत नावाच्या धडाकेबाज तरुणाची भूमिका साकारत आहे. ग्रे ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बदल्याची कथा आहे.

Vaibhav Tatvavadi, GREY

यात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार आपणांस ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.

Vaibhav Tatvavadi, GREY

अभिषेक जावकर दिग्दर्शित ग्रे चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला झी 5 प्रीमियर वर आपल्या भेटीस येणार आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम