अबू धाबीमध्ये अभिनेत्री हिना खानने स्विमवेअरवर ...

अबू धाबीमध्ये अभिनेत्री हिना खानने स्विमवेअरवर केलं तिच्या पीळदार शरीराचं प्रदर्शन (Vacation Mood: Hina Khan Shares Smoking Hot Picture In A Green Monokini From Abu Dhabi, Actress Also Enjoys Safari, See Stunning Pictures)

अभिनेत्री हिना खानकडे सौंदर्य, ग्लॅमर आणि टॅलेन्ट या तिन्ही गोष्टी आहेत. काही दिवसांपूर्वी हिनाने कान्स फेस्टिवलला उपस्थिती दर्शवली होती. तिथले तिचे घायाळ करणारे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता ती अबू धाबीला तिच्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. त्याआधी तिचा इनडोर स्काय डाइविंगची मजा घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

आता पुन्हा एकदा हिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आणि पोस्टवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ते पाहून ती अबू धाबीला खूप मजा करत असल्याचे दिसते. हिनाने हिरव्या स्विम वेअरमधला एक हॉट फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती तिच्या पीळदार शरीराचं प्रदर्शन करताना दिसते. या फोटोत ती खूपच सुंदर आणि फिट दिसत आहे.

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता हिना फारच ग्लॅमरस दिसत असून तिने स्विम वेअर सोबत लेयरिंग आणि ग्लेयर्स घातले आहे. फोटोत तिने केस मोकळे सोडलेले दिसतात.

हिनाने तिच्या पोस्टमार्फत तिथल्या खाद्यपदार्थ आणि सर्विसचे कौतुक केले.

तसेच तिथल्या प्राणी संग्राहालयात प्राण्यांना त्यांच्या आवडीचे खाद्य दिले असेही तिने पोस्टमध्ये सांगितले आहे.