निर्मात्यांच्या सांगण्यावरुन शुद्ध देसी रोमान्स...

निर्मात्यांच्या सांगण्यावरुन शुद्ध देसी रोमान्स चित्रपटासाठी वाणी कपूरला करावे लागले होते हे काम (Vaani Kapoor Had To Do Such Work For The Film ‘Suddh Desi Romance’ At The Behest The Makers, You Will Be Surprised To Know)

वाणी कपूर सध्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. वाणीने आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेकांना बंद खोलीच्या आत ऑडिशन द्यावी लागते असे म्हटले जाते. पण वाणीने ऑडिशनसाठी जे काही केले ते ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपले करीअर यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्यापैकी एक म्हणजे वाणी कपूर, ज्यांच्या डोक्यावर इंडस्ट्रीतील कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा हात नाही अशा परिस्थितीत अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्यांना अनेक ऑडिशन्समधून जावे लागले. 2013 मध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वाणीला या चित्रपटासाठी एका विचित्र ऑडिशन प्रक्रियेतून जावे लागले होते.

वाणीने या चित्रपटासाठी बंद खोलीत ऑडिशन न देता सगळ्यांसमोर लाइव्ह परफॉर्मन्स दिला होता. पण त्यात ती पास झाली आणि तिला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. वाणीने एका मुलाखतीत सांगितले की, ती एक कोणत्याही तयारी शिवाय घेतलेली टेस्ट होती. सुरुवातीला मला ते सर्व विचित्र वाटले पण नंतर मी स्वत:ला समजावले की मी हे जर सर्व  लोकांसमोर करु शकली नाही तर मी हे कॅमेऱ्यासमोर करु शकणार नाही. मला आत्मविश्वास दाखवलाच पाहिजे.

शुद्ध देसी रोमान्ससाठी वाणी कपूरचे खूप कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटात तिची सहाय्यक भूमिका होती. पण आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यावेळी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारसुद्धा मिळाला होता.

वाणी कपूरसाठी चित्रपटसृष्टीत येणे इतके सोपे नव्हते. केवळ फिल्मी दुनियेतच नाही तर वाणीला तिच्या घरातही यासाठी खूप संघर्ष करावा लागला. खरं तर, मॉडेलिंगपूर्वी अभिनेत्री हॉटेलमध्ये नोकरी करायची. पण नोकरी सोडून तिने मॉडेलिंग सुरू केले. सुरुवातीला तिच्या वडिलांना तिचे मॉडेलिंग अजिबात आवडले नाही, परंतु तिच्या आईने तिला पाठिंबा दिला. यानंतर वाणीने अनेक मोठ्या आणि लोकप्रिय डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. रॅम्प वॉकच्या माध्यमातूनच तिला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळाला.

वाणी कपूरने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तिने पर्यटन विषयात बॅचलर पदवी घेतली आहे. यानंतर तिने जयपूरच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशिप करुन आयटीसी हॉटेलमध्ये काम केले. त्याचवेळी हॉटेलमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, ते पाहून वाणी कपूरला चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली. यानंतर वाणीने चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे.