‘उतरन’ फेम टीना दत्ताचे बेफाम टॉपले...

‘उतरन’ फेम टीना दत्ताचे बेफाम टॉपलेस शूट (Uttaran Fame Tina Dutta Shares Topless Photos From Her Recent Photoshoot)

उतरन मालिकेतील निरागस दिसणारी इच्छा म्हणजे टीना दत्ता सध्या सोशल मीडियावर आग लावत आहे. तिच्या बॅक टू बॅक बोल्ड फोटोशूटने सगळ्यांना धक्का दिला आहे. अवखळपणाने वावरणारी टीना आता सेक्सी बनली आहे.

टीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट टॉपलेस बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इतक्या क्लासिकतेने शूट आणि एडिट केले आहेत की ज्यामुळे ते वल्गर न वाटता टीना या फोटोंत खूपच हॉट दिसत आहे.

टीनाने आपल्या फोटोंना कॅप्शन सुद्धा बोल्ड अंदाजात दिली आहे. ती म्हणते – मी तापमान वाढवलं तर तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? नवीन महिन्यात नवा बदल आवश्यक आहे. टीनाने पुढे लिहिलंय, हे फोटो एडिट केलेले आहेत; परंतु तुम्ही जर तुमच्या शरीराच्या बाबत कम्फर्टेबल असाल तर सर्व काही ठीक आहे. लक्षात ठेवा, दुसरे काय विचार करतील याची चिंता न करता स्वतःला काय योग्य वाटते ते करा.

टीनाच्या या पोस्टला चाहत्यांकडून अमाप पसंती मिळत आहे. तुम्ही देखील पाहा हे हॉट फोटो…

याआधीही टीनाने ग्लॅमरस फोटो शूट केलेले आहे… या फोटोतील टीनाचा हेअर लूक सगळ्यांना खूपच आवडला. कारण तिचा निरागस आणि सुंदर चेहरा सगळ्यांनाच आकर्षित करणारा आहे.

पारंपरिक वेशभूषेतील टीनाचा लूक चाहत्यांना विशेष पसंत असून तिचा हा लूक त्यांना निरागस इच्छाची आठवण करून देतो, जिला त्यांनी उतरन मध्ये पाहिले होते… भोळीभाबडी… इच्छा.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम (सर्व फोटो)