टॉपलेस दाखवून हौस भागली नाही म्हणून आणखी हॉट आण...

टॉपलेस दाखवून हौस भागली नाही म्हणून आणखी हॉट आणि बोल्ड फोटो टाकले ‘उतरन’ फेम टिना दत्ताने (‘Uttaran’ Fame Tina Dutta Bold Photos Goes Viral on Internet After Her Topless Pics)

‘उतरन’ फेम टिना दत्ता एरव्ही टी.व्ही. ची संस्कारी बहू म्हणून प्रसिद्धीस पावली असली तरी, प्रत्यक्ष जीवनात ती फारच हॉट आणि ग्लॅमरस अवतारात असते. आपल्या ग्लॅमरस्‌ फोटोंना प्रसिद्धी देऊन ती इंटरनेटचं तापमान वाढवत असते. काही दिवसांपूर्वीच टिनाने आपले बेफाम टॉपलेस शूट शेअर करून प्रसिद्धी मिळवली होती. त्याच्याने हौस फिटली नाही म्हणून तिने पुन्हा एकदा हॉट अवतार प्रदर्शित केला आहे. तिचे ताजे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टिनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून जे ताजे फोटो प्रसिद्ध केले आहेत, त्यामध्ये तिचे ग्लॅमरस्‌ रुप बघण्याजोगे आहे. हॉट आऊटफिट घालून टिना जमिनीवर झोपून पोझेस देत आहे. तिच्या ह्या फोटोंना चाहत्यांकडून बरेच लाइक्स व कमेंटस्‌ मिळत आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘उतरन’ मालिकेत इच्छा हे पात्र साकारणारी टिना दत्ताने या फोटोंबरोबर मजकूर लिहिला आहे – ‘मला निळ्या आणि हिरव्या भूमीवर विमान आणि पक्ष्यांच्या आकाशात घेऊन चला. जिथे आपण विहार करू शकतो. सीमा ओलांडण्याचा इंतजार आणि यात्रा…’ या फोटोंमधून टिनाचा बिनधास्त ग्लॅमर अवतार बघून तिचे चाहते मदहोश होत आहेत.

या ग्लॅमरस फोटोंसोबतचा टिनाने इन्स्टाग्रामवर आणखी एक अंगप्रदर्शन करणाऱ्या काळ्या ड्रेसचा फोटो प्रसिद्ध केला आहे. ‘रविवारचा आळसवार यापेक्षा अधिक चांगला कुठून असणार. जेव्हा सिंबाचं प्रेम मला मिळेल आणि खन्ना साहेब माझा फोटो घेतील…’ असा मजकूर त्यावर लिहिला आहे. या फोटोत तिचा पाळीव कुत्रा सिंबा पण दिसतो आहे.

टिनाच्या या फोटोवर तिचे चाहते बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे – ‘तुझी अशीच प्रगती होवो, असं आम्हा सगळ्यांना वाटतं.’ या लॉकडाऊनच्या काळात आपलं पर्यटन आणि प्रवासाला मुकली आहे. ज्याची तिला आवड आहे. म्हणून त्या आठवणी काढत तिने आपले असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

यापूर्वी आपले टॉपलेस फोटो शेअर करताना टिनाने लिहिले होते, ‘मी जर वातावरण गरम केले तर तुमची काही हरकत नाही ना. आपण जर आपल्या शरीराबद्दल कम्फर्टेबल असलो तर सगळं ठीक आहे… आपल्याला जे सोपं वाटेल ते करावं. लोक काय म्हणतील याचा विचार करू नये.’

टिना दत्ताच्या करिअर बाबत बोलायचं तर तिनं हिंदीसह बंगाली सिनेमात पण खूप नाव कमावलं आहे. छोट्या पडद्यावरील सुपरहिट अभिनेत्रींपैकी ती एक गणली जाते. बऱ्याच टी.व्ही. मालिकांमधून तिनं आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. फक्त ५ वर्षांची असताना टिनाने ‘पिता माता संतान’ या बंगाली मालिकेतून या क्षेत्रात पदार्पण केले. २००९ साली टिनाने हिंदी मालिकेतून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. ‘उतरन’ मालिकेतील इच्छा हे पात्र साकार करून ती घराघरात पोहचली आहे.