सोनम कपूरच्या नो मेकअप लूकमुळे लोकांनी घेतली ति...

सोनम कपूरच्या नो मेकअप लूकमुळे लोकांनी घेतली तिची फिरकी (Users Are Making Fun Of Sonam Kapoor For Her No Make Up Look)

अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. सध्या ती तिच्या आई होण्याआधीचा काळ मजेत घालवत आहे. सोनमने 4 वर्षांपूर्वी दिल्लीतील उद्योजक आनंद आहूजासोबत लग्न केले होते.  मार्च 2022 ला ती गरोदर असल्याची माहिती सोनमने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिली. सोनमच्या या गोड बातमीमुळे तिचे चाहते खूप खुश आहेत.

सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर सुद्धा तिच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. सोनम सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक जीवन घडणाऱ्या अनेक क्षणांचे फोटो पोस्ट करत असते. सोनमने तिच्या बेबी बंपचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सोनमला बॉलिवूडची फॅशनिस्टा असे म्हणतात. सोनम कपूर काही दिवसांपूर्वी तिचा बेबीमून साजरा करण्यासाठी इटलीला गेलेली. तिने तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले. पण त्यातल्या काही फोटोंमुळे तिला ट्रोल देखील करण्यात आले.

त्यात सोनमने मेकअप न करता फोटो पोस्ट केले होते. लोकांच्या मते मेकअप न करता सोनम फारशी चांगली दिसत नव्हती. ती एका सर्वसाधारण मुलीप्रमाणेच दिसत होती. काही लोक तर तिला त्या फोटोत ओळखू शकले नाही. सोनमच्या त्या नो मेकअप लूकची लोक खूप फिरकी घेत आहेत.

सोनमच्या त्या फोटोंवर एका युजरने कमेंट केली की पहिल्यांदा मी तो फोटो पाहिला तेव्हा ती मला पूनम पांडे वाटली, तर दुसऱ्या यूजरने लिहिले , सोनमला डॅण्ड्रफ झाल्यासारखे वाटते, तर आणखी एका यूजरने म्हटले की ही नक्की सोनमच आहे ना मी तर हिला ओळखूच शकलो नाही. एका यूजरने सोनमची फिरकी घेत , हो फोटो पाहून मला , मी नुकताच हॉरर चित्रपट पाहिल्यासारखे वाटते असे म्हटले आहे.

सोनम वयाच्या 36 व्या वर्षी आई होणार आहे. तिने 2007 मध्ये सावरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. पण तिला त्यात तिच्या वडीलांसारखे यश कमावता आले नाही. सोनम सर्वात शेवटी 2020 मध्ये एके वर्सेस एके या चित्रपटात दिसली होती.