इजा – जखमा वा सूज यावर घरगुती उपचार (Usef...

इजा – जखमा वा सूज यावर घरगुती उपचार (Useful Home Remedies For Injury, Swelling)

रस्त्यावरून चालता चालता, घरातील काम करताना, घसरून पडलात किंवा मग पडल्यानंतर पाय मुरगळलाय, जखम झालीय वा सूज आली आहे, तर अशा वेळी घरच्या घरी काही उपाय करून दुखणे लगेच बरे करता येते.

Home Remedies For Injury

पाय मुरगळला असल्यास त्या जागी तिळाचं तेल लावून त्यावर हळद भुरभुरा आणि छोट्या टॉवेलने पाय झाकून ठेवा. नंतर एका कपड्यामध्ये मीठाची पोटली बांधून घ्या. ही पोटली तव्यावर गरम करून घ्या. आणि पायावरील टॉवेलवरूनच हलके हलके शेकवा.

इजा झाल्यानंतर जखमेतून जास्त रक्त येत असेल तर तुरटीची पावडर करून त्यावर भुरभुरा. यामुळे रक्त येण्याचं थांबेल.

कडुलिंबाचा पाला वाटून काही दिवस जखमेवर बांधून ठेवल्यास जखम लवकर भरते.

उंबराची पानं वाटून जखमेवर काही दिवस लावा. जखम लवकर भरते.

जखम झालेल्या ठिकाणी खाण्याचा चुना आणि मध एकत्र करून लावल्यास जखम लवकर भरते.

हातापायास फॅक्चर झाल्यामुळे जर सूज आली असेल वा त्यामुळे वेदना होत असतील तर कांदा ठेचून त्यात हळद आणि तिळाचं तेल मिसळा. हे मिश्रण हलकेच गरम करून जखमेवर वा सूज आलेल्या ठिकाणी एक रात्र बांधून ठेवा.

इजा झाल्यामुळे जर मोठी जखम झाली आहे, तर तेथे तुपामध्ये कापूर मिसळून लावा.

दुर्वा वाटून जखमेवर लावल्यास फायदा होतो.

4 चमचे तिळाच्या तेलामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या व 1 चमचा हळद एकत्र करून मंद आचेवर हलकेच गरम करा. हे मिश्रण जखमेवर लावून कपड्याने जखम बांधा.

हळद आणि तिळ एकत्र करून हलकेच गरम करा. हे मिश्रण जखमेवर लावून त्यावर एरंड्याची पानं बांधा. त्यामुळे जखम लवकर बरी होईल.

Home Remedies For Injury

दगड वा लाकूड लागल्यामुळे जखम झाली आणि सूज आली असेल तर चिंचेची पानं उकळवून जखमेवर बांधून ठेवा. किंवा चुना आणि हळद गरम करून लावल्यासही लगेच गुण दिसतो.

शरीरावर कोठेही इजा झाली असल्यास आलं किसून पाण्यात हलकेच उकळून घ्या आणि दुखर्‍या जागी लावा.

जखम मोठी असेल तर कडुनिंबाची 20-25 ताजी पानं पाण्यातून वाटून मग स्वच्छ कापडाने गाळून घ्या. गाळलेल्या कडुनिंबाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घाला. आता या पाण्यात कापसाचा बोळा बुडवून, गरम तव्यावर तुपावर हा बोळा गरम करा. कापूस जळू लागला की तो तव्यावरून काढून थंड करून जखमेवर लावून त्यावर पट्टी बांधून ठेवा.

पाण्यात सैंधव मीठ घालून त्या पाण्यात कपडा भिजवून त्याने जखमेवर शेकल्यास आराम मिळतो.

जखमेवर ओवा वाटून लावा आणि त्यावर कापडाची पट्टी बांधा.

जर मुका मार असेल किंवा आतून जखम झाली असेल तर एरंडेलच्या पानांवर राईचं तेल लावा. ती पानं हलकेच गरम करून दुखर्‍या जागी बांधून ठेवा.

इजा झालेल्या जागी खूप रक्तस्त्राव होत असेल तर एक कपडा रॉकेलमध्ये भिजवून त्या जागी बांधल्यास रक्त येणे थांबते.

मुरगळल्यामुळे आलेली सूज घालविण्यासाठी कोमट पाण्यामध्ये तुरटी घालून त्या पाण्याने सूजेवर शेकवावे.

Home Remedies For Injury

जखम झाल्यास त्या जागी गव्हाच्या पीठामध्ये राईचं तेल घालून ते पीठ जखमेवर बांधा.

सगळ्यात शेवटचा आणि अतिशय उपयुक्त असा इलाज म्हणजे तुळशीची पानं वाटून जखमेवर लावा. जखम लगेच बरी होते.