पारदर्शक बिकिनी घालून उर्वशी रौतेला ‘डेट नाइट’ ...

पारदर्शक बिकिनी घालून उर्वशी रौतेला ‘डेट नाइट’ साजरी करायला गेली; तिचे धाडस पाहून चाहते चक्रावले (Urvashi Routela Wore A Transparent Bikini With Bralette On ‘Date Night’, Her Boldness Drove Fans Crazy)

अभिनेत्री उर्वशी रौतेलाला चाहत्यांची कमतरता नाहीये. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या उर्वशीने तिचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे जो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे ती सुंदर दिसत आहे आणि लाखोने तिला लाइक्स मिळाले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

उर्वशी रौतेलाने अलीकडेच शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती ऑन द फ्लेर या गाण्यावर रिल बनवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते वेडे होत आहेत. उर्वशीच्या इन्स्टाग्रामवर ४३ मीलियन पेक्षाही अधिक चाहते आहेत आणि २४०० हून अधिक लोकांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स दिल्या आहेत.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

उर्वशी रौतेलाने या व्हिडिओत क्रीम कलरची ब्रालेट आणि बिकिनी घातली आहे. त्यावर पारदर्शक वस्त्र घातलेले आहे. तिने इयररिंग्सही घातले आहेत. या पेहरावात ती खूपच सुंदर दिसते आहे. फोन वर बोलतानाचा उर्वशीचा अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. कमेंट्‌समध्ये चाहतेही तिची तोंड भरून प्रशंसा करत आहेत.

याआधीही उर्वशनी रौतेलाने पारदर्शक ब्रालेट घातलेला तिचा फोटो पोस्ट केला होता. अभिनेत्रीच्या त्या फोटोला चाहत्यांनी विशेष पसंती दर्शविली होती. बॉलिवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्रीने अनेक चित्रपटांत काम केले आहेच शिवाय काही सौंदर्य स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. ती सतत आपल्या चाहत्यांसोबत बातचीत करत राहते.