उर्वशी रौतेलाने आरशासमोर इतके नखरे दाखवले की, च...

उर्वशी रौतेलाने आरशासमोर इतके नखरे दाखवले की, चाहते बोलले – मार ही डालोगी क्या? (Urvashi Rautela’s Sizzling Avatar Raised The Internet’s Mercury, Fans Said – Will You Kill Me)

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अधूनमधून सोशल मीडियावर आपले दिलखेचक फोटो आणि व्हिडिओ टाकून लोकांचे लक्ष वेधून घेत असते. आता तिने असाच एक नखरेबाज व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना आकर्षिक करून घेतले आहे.

Urvashi Rautela

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

या व्हिडिओत उर्वशी आरशासमोर उभी आहे. अन्‌ वेगवेगळ्या पोझेस देते आहे. ती या व्हिडिओत सुंदर दिसते आहे खरी, पण हॉटनेस इतका आहे की, तिच्या चाहत्यांना वेड लागल्यासारखे झाले आहे. तिनं गोल्डन गाऊन घातला आहे. त्यामधून तिच्या अंगप्रत्यंगाचे इतके दर्शन होत आहे की, तुमची नजर खिळून राहील.

Urvashi Rautela

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

आरशासमोर उर्वशीने इतके नखरे दाखवले आहेत की, कोणीही तिच्यावर मोहित होईल. लाइट मेकअप्‌ आणि स्टायलिश हेअर स्टाईलने तिचे रूप अधिकच खुलून आले आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

या व्हिडिओसोबत दिलेल्या मजकुरात उर्वशी म्हणते, “वातावरणात ख्रिसमसचा आनंद पसरला आहे. तुम्ही इतकेही मोठे होऊ नका की, ख्रिसमसच्या रात्री आकाश दिसणार नाही, अशी मी आशा करते. डिसेंबरची अखेर छानपैकी साजरी करण्यासाठी घरापेक्षा चांगली जागा नाही.”

Urvashi Rautela

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘मिस युनिव्हर्स २०२१ पेजेंट’ आवरून उर्वशी अलिकडेच परत आली आहे. तेव्हापासून ती आपले फोटो व व्हिडिओ सतत पोस्ट करते आहे. या स्पर्धेची उर्वशी एक परीक्षक होती. याच स्पर्धेत भारताच्या हरनाज संधू या स्वरुपसुंदरीची निवड झाली, तेव्हा उर्वशीला खूपच आनंद झाला होता.