उर्वशी रौतेलाचा गाऊन इतका महागडा, की त्याच्या क...

उर्वशी रौतेलाचा गाऊन इतका महागडा, की त्याच्या किंमतीत आपण एक फ्लॅट घेऊ… (Urvashi Rautela Wore Such An Expensive Gown, You Can Buy a Flat For So Much Money)

नेहमी आपल्या स्टाईलमुळे चर्चेत राहणारी उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरेत आली आहे. यावेळीही केवळ तिच्या स्टाईलमुळेच ती चर्चिली जात आहे. कारण यावेळी अभिनेत्रीने इतका महागडा गाऊन घातला आहे की तेवढ्या किंमतीत आपण एक फ्लॅट घेऊ शकू. सुरुवातीला या ड्रेसच्या किंमतीवर विश्वास ठेवणे कठीण आहे, परंतु गाऊनचे सौंदर्य पाहून विश्वास वाटू लागतो. हा गाऊन इतका जड आणि आकर्षक आहे की तो अभिनेत्रीच्या अतुलनीय सौंदर्यात भर घालत आहे.

Urvashi Rautela, An Expensive Gown

उर्वशी नेहमी आपल्या ड्रेसच्या बाबत नवे नवे प्रयोग करत असते. सोशल मीडियावरही उर्वशी बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियावर आपले फोटोज्‌ आणि व्हिडिओज्‌ पोस्ट करत ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे फॅन फॉलोइंगही बरेच आहेत. चित्रपटांपेक्षा ती रॅम्पवर आणि फॅशन शोमध्ये अधिक सक्रीय असते. आता जो ड्रेस चर्चेत आहे तो देखील तिने एका फॅशन शो दरम्यान घातलेला आहे. उर्वशीने अलीकडेच सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मायकेल सिनकोसाठी एक फॅशन शो केला होता.

Urvashi Rautela, An Expensive Gown

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

या फॅशन शो दरम्यान उर्वशीच्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की ती एका अप्सरेसारखी सुंदर दिसत आहे. या फॅशन शोमध्ये अभिनेत्रीने हेवी बॉल गाऊन परिधान केला होता, जो खूप सुंदर दिसतो आहे आणि पाहताक्षणीच तो खूप महाग असेल याची प्रचिती येते. खरोखर रिपोर्ट्सनुसार, उर्वशीच्या या गाऊनची किंमत ४० लाख रुपये आहे.

Urvashi Rautela, An Expensive Gown

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

उर्वशी रौतेलाची, प्रसिद्ध डिझायनर मायकल सिनकोसाठी रॅम्प वॉक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिने याआधी इजिप्शियन राजकुमारी क्लियोपेट्राच्या ड्रेसमध्ये अरब फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केले होते. सध्या, उर्वशी रौतेलाचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Urvashi Rautela, An Expensive Gown

उर्वशीच्या कामाबाबत बोलायचं तर ती लवकरच तमिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे, जो मोठ्या बजेटचा असणार आहे. या चित्रपटात ती आयआयटीयन आणि मायक्रोबायोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिथे ती ‘थिरुतु पायले 2’ आणि ‘ब्लॅक रोज’ च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. याशिवाय ती जिओ स्टुडिओच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिका साकारत आहे. ही वेब सिरीज सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या वास्तविक कथेवर आधारित आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम